Ganesh Chaturthi 2025 Date Time : दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. गणेशभक्त ११ दिवस गणपती बाप्पाची आरती, भजन, कीर्तनात दंगून गेले. बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज अखेर अनंत चतुर्दशीला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला जात आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत केला जात आहे. अशा प्रकारे सर्व भक्तगण धुमधडाक्यात बाप्पाला निरोप देत आहेत. पण अशा प्रकारे दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते. पण, तुम्हाला माहितेय का? पुढच्या वर्षी गणपती बाप्पा नेमके कोणत्या तारखेला विराजमान होणार आहेत? चला जाणून घेऊ तारीख आणि शुभ मुहूर्त…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. त्यानुसार २०२५ मध्ये गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ रोजी (बुधवार) साजरी केली जाईल. म्हणजे या वर्षाच्या तुलनेत पुढच्या वर्षी गणपती बाप्पा ११ दिवस आधीच विराजमान होतील. या दिवशी गणेशाची पूजा केली जाईल; तर गौरी-गणपती विसर्जन हे २ सप्टेंबर २०२५ रोजी होईल. तर अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबर २०२५ रोजी आहे.

म्हणजेच पुढच्या वर्षी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर ११ दिवसांनी गणपती बाप्पाचे विसर्जन होईल.

हेही वाचा – वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी चढाओढ, धक्काबुक्कीत भाजपाच्या महिला आमदार पडल्या रेल्वे ट्रॅकवर;  Video व्हायरल

गणेश चतुर्थी २०२५ शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi 2025 Shubh Muhurat)

पुढच्य वर्षी २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी होईल. या दिवशी श्रीगणेशाच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११.०५ ते दुपारी १.४० पर्यंत असेल. या दिवशी निषिद्ध चंद्रदर्शन वेळ सकाळी ०९.२८ ते रात्री ०८.५७ पर्यंत असेल.

गणेश चतुर्थी महत्त्व (Importance Of Ganesh Chaturthi)

गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्ताला बुद्धी, समृद्धी व सौभाग्य प्राप्त होते, असे मानले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सव सुरू होतो. हा उत्सव १० दिवस चालतो. या उत्सवात गणेशाची विधिवत पूजा केल्यास शुभ फल प्राप्त होते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2025 know when is ganesh chaturthi in 2025 ganesh utsav 2025 date time anant chaturdashi 2025 date sjr