Garuda Purana: कोणत्याही व्यक्तीच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचे फळ त्याला मिळते. याचा उल्लेख गरुड पुराणात आहे. गरुड पुराणातील १९ हजारांहून अधिक श्लोक पुण्य आणि पापकर्मांविषयी सांगतात. खरं तर, एकदा महर्षि कश्यप यांचा मुलगा पक्षीराज गरुड याने भगवान विष्णूंना प्राण्यांच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल विचारलं. गरुडची जिज्ञासा सोडवण्यासाठी भगवान विष्णूंनी जे काही सांगितले, त्याचा उल्लेख गरुड पुराणात आला आहे. गरुड पुराणात सांगितले आहे की, जेव्हा स्त्रिया दोन महत्वाच्या गोष्टी करतात तेव्हा पुरुषांनी त्याकडे पाहू नये. याबद्दल पुढे जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्नान करताना
गरुड पुराणानुसार जेव्हा एखादी स्त्री कपड्यांविना स्नान करत असते तेव्हा पुरुषाने तिला पाहू नये. अशा स्थितीत पुरुषाने स्त्रीला पाहिल्यास तो पापी ठरतो. त्यामुळे त्याची सर्व पुण्यकर्मे नष्ट होतात. एवढंच नाही तर अशा पुरुषांना नरकात कठोर शिक्षाही दिली जाते.

आणखी वाचा : Makar Sankranti 2022: २९ वर्षांनंतर बनतोय शनी-सूर्याचा संयोग, १४ जानेवारीपासून या ४ राशींचे नशीब उजळणार

स्तनपान करताना
स्त्रिया आपल्या बाळाला आईच्या दुधाद्वारे दूध पाजतात. अशा स्थितीत बाळाला दूध देताना आईचे स्तन कधीही दिसू नयेत. गरुड पुराणातील या नियमाचे उल्लंघन करून त्यांच्याकडे वाईट हेतूने पाहिल्यास तो मोठ्या पापात सहभागी होतो. अशा पापी माणसाला मरणोत्तर नरकात कठोर यातना भोगावी लागतात.

(टीप: इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garuda purana says when women do these 2 things then men should not prp