Gemini Annual Horoscope 2025 : मिथुन ही बुधाची रास आहे. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. नुसती हुशारी नाही तर व्यवहारज्ञान आणि चुणचुणीतपणादेखील बुध देतो. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये या छटा स्पष्ट दिसतात. नर्म विनोद, काव्य-शास्त्र या विषयांची आपणास मूलतः ओढ असते. काहीसा मिश्कीलपणा आणि चौकस बुद्धी ही आपली खरी ओळख आहे. एखादी गोष्ट बघताना, ऐकताना आपल्याला प्रश्न पडले नाहीत किंवा मनात शंका आल्या नाहीत तरच नवल! अशा या मिथुन राशीला २०२५ हे नववर्ष कसे असेल हे पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशी बदल मिथुन राशीच्या दृष्टीने असे आहेत… १८ मार्चला हर्षल लाभ स्थानातील मेष राशीतून व्यय स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. २९ मार्चला शनी भाग्य स्थानातील कुंभ राशीतून दशम स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल. १४ मे रोजी गुरू व्ययातील वृषभ राशीतून आपल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. २९ मे रोजी राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे दशम स्थानातून भाग्य स्थानात आणि चतुर्थ स्थानातून तृतीय स्थानात प्रवेश करेल.

मिथुन राशीसाठी २०२५ वर्ष कसे असणार? जाणून घ्या (Gemini Yearly Horoscope 2025)

जानेवारी ( January Horoscope 2025) :

नववर्षाची सुरुवात मध्यम मानाने झाली तरी मकर संक्रांतीनंतर कार्याला वेग येईल. विद्यार्थी वर्गाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने पुढे चला. गुरुबल कमजोर आहे. नोकरी व्यवसायात आत्मविश्वास ढळू देऊ नका. पुस्तकी ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याची हीच खरी वेळ आहे. कुठेही, कोणाशीही बोलताना तोलून मापून बोलावे. अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागणार नाही. विवाहोत्सुकांनी संशोधन सुरू ठेवावे. योग सुरू झालेला नाही, परंतु प्रयत्न थांबवूनही चालणार नाही. जोडीदाराच्या वैयक्तिक समस्या समजून घ्याल. त्यावर उपाय वा पर्याय काढाल. गुंतवणूकदारांच्या पारड्यात सध्या ग्रहांचे झुकते माप नसल्याने थोडे सबुरीने घ्यावे. वाट बघणे हिताचे ठरेल. घर, जमीन, प्रॉपर्टीचे कामकाज मुंगीच्या पावलाने पुढे सरकेल.

फेब्रुवारी ( February Horoscope 2025) :

तार्किक ज्ञानाचा खूप फायदा होईल. भल्याभल्यांना जे समजत नाही, उमजत नाही ते आपणास उमजेल. परिस्थिती चतुराईने हाताळाल. विद्यार्थी वर्गाची खरी कसोटी आता सुरू झाली आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मोठे यश मिळेल. नोकरी व्यवसायात लोकांना आपली योग्यता आपल्या कामाच्या उत्तम दर्जातून दाखवून द्यावी. गुरुबल कमजोर असल्याने आपली बाजू घेणारे कोणी नसेल. न डगमगता धीराने, खंबीरपणे उभे राहाल. विवाहोत्सुकांनी जोडीदाराचे संशोधन सुरू ठेवावे. विवाहित दाम्पत्यांना जोडीदाराची चांगली साथ मिळेल. एकमेकांच्या उणीवा भरून काढाल. कुटुंबात प्रेम, जिव्हाळा किती महत्त्वाचा आहे याची प्रचिती येईल. महाशिवरात्रीला कठीण परीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडाल. गुंतवणूकदारांना शनीची साथ मिळेल. दीर्घ मुदतीची गुंतवणूक अतिशय लाभकारक ठरेल.

मार्च ( March Horoscope 2025) :

गुरुबल कमजोर असले तरी भाग्य स्थानातील शनीची साथ चांगली मिळेल. त्या जोरावर विद्यार्थी वर्गाने आत्मविश्वासपूर्वक परीक्षेला सामोरे जावे. परीक्षेच्या सरावाइतकाच दृढ निश्चय आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. परदेशासंबंधित काही कामे मार्गी लागतील. त्या संदर्भातील बातमी होळीच्या सुमारास मिळेल. होळीची पुरणपोळी अधिक गोड लागेल. १८ मार्चला हर्षल लाभ स्थानातून व्यय स्थानात वृषभमध्ये प्रवेश करेल, तर २९ मार्चला शनी भाग्य स्थानातून दशम स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल. नोकरी व्यवसायात आपल्या कार्यक्षेत्रात चांगले बस्तान बसेल. गुढीपाडव्याच्या दरम्यान स्वतःचे अढळ पद निर्माण कराल. विवाहोत्सुकांनी थोडे सबुरीने घ्यावे. विवाहित दाम्पत्यांनी आपला निर्णय जोडीदारावर थोपवू नये. गुंतवणूकदारांना चांगले दिवस आहेत.

एप्रिल ( April Horoscope 2025) :

नव्या आर्थिक वर्षात अनेक लाभकारक घटना घडतील. लाभ स्थानातील उंंचीचा रवी आत्मविश्वास देईल. अडीअडचणीतून मार्ग काढत पुढे जाल. विद्यार्थी वर्गाला स्पर्धात्मक परीक्षांसाठी ग्रहमान पूरक आहे. अनुभवी शिक्षकांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी नव्या ओळखी होतील. नव्या संकल्पना अमलात आणाल. हितशत्रूंचा त्रास वाढेल. युक्ती आणि कृतीने त्यांना त्यांची जागा दाखवून द्याल. प्राप्तीचे प्रयत्न सुरू ठेवावेत. जोडीदाराची साथ आणि कुटुंबाचा आधार यांचे महत्त्व पटेल, याबद्दलची कृतज्ञता जरूर व्यक्त करावी. गुंतवणूकदारांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. घराचे काम सध्या तरी लांबणीवर पडेल. आरोग्य चांगले राहील. अक्षय्य तृतीया अक्षय्य आनंद घेऊन येईल.

मे ( May Horoscope 2025) :

काम केल्याचे समाधान देणारा हा महिना असेल. मुख्य म्हणजे १४ मे रोजी गुरू व्ययस्थानातील वृषभ राशीतून आपल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल सुधारेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना गुरुची साथ मिळेल. विद्यार्थी वर्गाच्या महत्त्वाच्या परीक्षा उत्तमरीत्या पार पडतील. नोकरी व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेचा आणि विचारांचा प्रभाव पाडाल. जिद्दीने, हिमतीने आगेकूच कराल. सहकारी वर्गाला योग्य मार्गदर्शन दिल्याने कामाला गती येईल. विवाहोत्सुकांना जोडीदार संशोधनाचा लाभ होईल. पेराल ते उगवते या न्यायानुसार बुद्ध पौर्णिमा सुख समृद्धी घेऊन येईल. २९ मे रोजी राहू कुंभ राशीत व केतू सिंह राशीत वक्र गतीने प्रवेश करतील. परदेशातील किंवा त्या संबंधित कामात यश मिळेल. उष्णतेमुळे घसा सुजणे, लाल होणे असा त्रास होण्याची संभावना आहे.

जून ( June Horoscope 2025) :

बुध, गुरू या ग्रहांच्या पाठबळावर मोठा पल्ला गाठाल. बुद्धी आणि ज्ञानाचा व्यवहारात योग्य विनियोग कराल. विद्यार्थी वर्ग शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच सतर्क राहील. धरसोड करण्यापेक्षा सातत्य राखणे अधिक हिताने ठरेल. नोकरी व्यवसायात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवाल. होतकरू मुलामुलींना योग्य मार्ग दाखवाल. विवाहोत्सुकांना गुरुबल चांगले आहे. जुन्या ओळखीच्या व्यक्ती, मित्र-मैत्रिणी नव्याने भेटतील. विवाहित दाम्पत्यांना जोडीदाराच्या सहवासाचे सुख लाभेल. वटपौर्णिमेच्या दरम्यान आर्थिकदृष्ट्या उन्नती होईल. गुंतवणूकदारांचा आलेख उंचावेल. पोकळ व भासमान दरवाढीला भुलू नका. प्रॉपर्टीच्या बाबतीत तज्ज्ञांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. अपचन, पित्त व वाताचा विकार बळावण्याची शक्यता आहे.

जुलै (July Horoscope 2025) :

आवश्यकता आणि उपयुक्तता तपासून मगच खर्च करावा. आषाढी एकादशी मनावर ताबा मिळविण्यास साहाय्य करेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर मन एकाग्र करावे. नियमितपणाने घेतलेली मेहनत लाभदायक ठरेल. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षक आणि मित्रांच्या सहाय्याने शंका दूर होतील. नोकरी व्यवसायात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. विवाहोत्सुकांचे विवाह योग जुळून येतील. ओळखीचे रूपांतर नात्यात होण्याची शक्यता आहे. संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. यासाठी वैद्यकीय सल्ला किंवा उपचार घ्यावे लागतील. घराच्या संबंधातील बोलणी आकार घेतील. वडिलोपार्जित इस्टेटीबाबत विचारविनिमय होतील. तज्ज्ञ वकिलांचा सल्ला उपयोगी पडेल. गुंतवणूकदारांना चांगला लाभ अपेक्षित आहे. कफ, खोकला आणि सर्दीचा त्रास देईल.

ऑगस्ट ( August Horoscope 2025) :

सणवार साजरे करण्यात मन उत्साहित होईल. सामाजिक बंध दृढ होतील. गरजूंना मदत कराल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी आपल्या छंदासाठी थोडा वेळ राखून ठेवावा. नोकरी व्यवसायात नारळी पौर्णिमेच्या आसपास महत्त्वाची आर्थिक उलाढाल होईल. सर्वांना लाभकारक असतील अशा योजना अमलात आणाल. विवाहोत्सुक मंडळींना जोडीदार संशोधनाच्या कार्यात यश मिळेल. नातेवाईक, मित्रमंडळी यांची मदत घ्याल. विवाहित दाम्पत्य आपल्या जोडीदाराच्या आवडीनिवडी जपतील. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दरम्यान मनोबल एकवटून आगेकूच कराल. गुंतवणूकदारांसाठी या महिन्यात खूपच चढउतार असतील. सावधगिरी बाळगणे अतिशय गरजेचे आहे. श्री गणेशाच्या आगमनाने नवा उत्साह निर्माण होईल.

सप्टेंबर ( September Horoscope 2025) :

महिन्याची सुरुवात आनंदात होईल. मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी घडतील. विद्यार्थी वर्गाला आपल्यातील कला, गुण सादर करण्याची संधी मिळेल. अभ्यास बाजूला न ठेवता आवडत्या विषयांसाठीदेखील वेळ काढाल. नोकरी व्यवसायात होतकरू मंडळींना मदतीचा हात द्याल. त्यांना योग्य मार्गदर्शन कराल. पितृपक्षात पूर्वजांच्या स्मरणार्थ दानधर्म कराल. तसेच सामाजिक संस्थेमध्ये बौद्धिक व वैचारिक योगदान द्याल. विवाहोत्सुक मंडळींचे ओळखीतून विवाह जमण्याची शक्यता आहे. प्रयत्न सुरू ठेवा. विवाहितांचे संतान प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. घर, जमीन, शेत, वाहन यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांना चालना मिळेल. नवरात्रात या कामांना गती येईल. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी. उष्णता व मूत्रविकाराच्या तक्रारी वाढतील.

ऑक्टोबर ( October Horoscope 2025) :

महिन्याची सुरुवात दसऱ्याने होत आहे. द्वेष, राग आणि दुःख या नकारात्मक भावनांचे दहन कराल. विद्यार्थी वर्गाने आळस झटकून कामाला लागावे. धरसोड न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने दिवाळी आनंदाची आणि प्रगतीची असेल. वरिष्ठांचे पाठबळ मिळाल्याने वेगाने पुढे जाल. १८ ऑक्टोबरला गुरू द्वितीय स्थानातील कर्क राशीत उच्च होत आहे. लाभकारक बातमी समजेल. विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. वैचारिक आणि प्रेमाचे धागे जुळतील. विवाहित मंडळींना जोडीदार समजून घेईल. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी उत्तमप्रकारे पार पडेल. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक गुंतवणूक केल्यास विशेष लाभ होईल. पचन, उत्सर्जन, पोटदुखी बळावेल.

नोव्हेंबर (November Horoscope 2025) :

बौद्धिक आणि कलात्मकतेचा सुवर्ण संगम या महिन्यात होणार आहे. नव्या संकल्पना अमलात आणताना तंत्रज्ञान उपयोगी पडेल. विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने अभ्यासासह इतर आवडीच्या विषयातही रस घ्याल. अभ्यासाचा ताण न घेता वेळापत्रकानुसार विषयांची आखणी कराल. ११ नोव्हेंबरला गुरू वक्री होईल. नोकरी व्यवसायातील राजकारणात फसू नका. व्यवहार ज्ञान आणि तार्किक ज्ञान जागरूक ठेवा. देवदिवाळी ते चंपाषष्ठी हा कालावधी अधिक सतर्क राहण्याचा आहे. विवाहोत्सुकांनी वधूवर संशोधन सुरू ठेवावे. योग जुळून येतील. गुंतवणूकदारांना धोक्याची सूचना मिळेल. दुसऱ्यावर सर्वतोपरी विश्वास टाकणे योग्य नाही. घराच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवहार सांभाळून भावनिक समतोल साधाल. पोट बिघडणे, आतड्याला इन्फेक्शन होणे असे त्रास संभवतात.

Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी

डिसेंबर ( December Horoscope 2025) :

वर्षाच्या सरत्या महिन्याच्या सुरुवातीलाच दत्त जयंती आहे. ५ डिसेंबरला गुरू वक्र गतीने पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल चांगले असल्याने कामांना गती येईल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासाची गोडी लागेल. बुद्धिमत्तेच्या जोडीला सातत्य आणि मेहनत महत्त्वाची. नोकरी व्यवसायाबाबत मोठे निर्णय घ्याल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे योग्य पाऊल टाकाल. विवाहोत्सुकांना सुयोग्य जोडीदार निवडीची संधी मिळेल. विवाहित दाम्पत्यांमध्ये लहान मोठे वैचारिक वाद होतील. वाद किती ताणावा यावर आपला ताबा ठेवायलाच हवा. संतती प्राप्तीचे योग चांगले आहेत. त्यानुसार जरूर नियोजन करावे. घर, वाहन, जमीन यांचे व्यवहार आकार घेतील. गुंतवणूकदारांना थोडी कळ सोसावी लागेल. आरोग्याच्या किरकोळ वाटणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको.

असे असेल मिथुन राशीसाठी २०२५ हे वर्ष. गुरुबल चांगले असल्याने बरीचशी कामे मार्गी लागतील. शिक्षणात प्रगती होईल. नोकरीत उत्तम यश मिळेल. विवाह ठरतील. संतती योग चांगला आहे. कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.आर्थिक गुंतवणूक करताना सावधानी घ्यायला लागेल. एकंदरीत वर्ष उत्साहात, आनंदात जाईल.