-सोनल चितळे

Gemini Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: मिथुन ही बुधाची रास आहे. बुध हा बुद्धिमत्ता , सादरीकरण, बोलणे, लिहिणे याचा कारक ग्रह आहे. बुधाचे हे गुण आपणास मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने दिसून येतात. चांगली बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती, तर्क लावणे हे त्यांचे विशेष गुणधर्म आहेत. नवनवीन गोष्टी शिकण्याची त्यांना आस असते. हास्य विनोदाने वातावरण खेळकर ठेवणे त्यांना सहज जमते. एखाद्या गोष्टीचे विश्लेषण करून सांगणे, समयसूचकता दाखवणे, प्रभावी वक्तव्य सादर करणे यात मिथुन राशीच्या व्यक्तींचा हातखंडा असतो. आपल्या बोलण्याने त्या एखाद्याचे बौद्धिक वा वैचारीक मतपरिवर्तनही करू शकतात. चंचल स्वभाव, अस्थिर मन आणि कधीकधी बोलण्यात अनाठाई वेळ घालवल्याने महत्वाच्या प्रसंगी योग्य निर्णय घेताना त्यांची तारांबळ उडते. अशा या मिथुन राशीच्या मंडळींना २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू.

१७ जानेवारीला आपल्या भाग्य स्थानातील कुंभ राशीत शनी प्रवेश करेल, अडचणी दूर होतील. आपल्या बुद्धिमत्तेला संशोधक वृत्ताची जोड मिळेल. चिकाटीने उच्च शिक्षण घ्याल. सातत्य टिकवाल. मोठे प्रवास कराल. परदेशी जाण्याची संधी उपलब्ध होईल. २१ एप्रिलपर्यंत गुरू आपल्या दशम स्थानातील मीन राशीत स्थित असेल. कामाच्या ठिकाणी आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग कराल. उच्च पद भूषावाल. २१ एप्रिलला गुरू आपल्या लाभ स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. आपणास चांगले गुरुबल प्राप्त होईल. नव्या संधी मिळतील. कामाच्या स्वरूपात बदल होण्याच्या शक्यता आहेत. अधिक जबाबदाऱ्या स्वीकाराल. त्या नेटाने पूर्ण करणे हे मात्र आपल्यावर अवलंबून राहील. या संपूर्ण वर्षभरात हर्षल आपल्या लाभ स्थानातील मेष राशीतून भ्रमण करेल. धडाडीने नव्या तंत्रज्ञानाचा आपल्या कामकाजात अवलंब कराल. कामाव्यतिरिक्त बौद्धिक पातळीला आव्हान देणारे छंद देखील या वर्षात जोपासायला मिळतील. २८ नोव्हेंबरपर्यंत या हर्षलसह राहू देखील मेष राशीत स्थित असेल. मैत्रीखातर कोणतेही व्यवहार डोळे झाकून करू नका, विवेक बुद्धी जागरूक ठेवावी. अशा या महत्वाच्या ग्रह बदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता एकंदरीत मिथुन राशीचे वार्षिक ग्रहफल असे आहे….

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
chatura loksatta marathi news
स्त्री आरोग्य : नववर्षाचा संकल्प; फिट राहा!
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी

जानेवारी :

कष्टाचे चीज होईल. ग्रहबल चांगले असल्याने मेहनत फळास येईल. धरसोड वृत्तीला मात्र आळा घालावा लागेल. विद्यार्थीवर्गाने एकाग्रता वाढवावी. बुद्धीमत्ता तर आपल्याकडे आहेच. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यास ग्रहमान पूरक आहे. मनाजोगते शिक्षण घेऊ शकाल. नोकरदार वर्गाला आपल्या कामाची पोचपावती मिळेल. बराच काळ रखडलेली बढती मिळण्याचे योग आहेत. प्रामाणिक मेहनतीचे चीज होईल. डोळ्यांचे विकार सतावतील. १७ जानेवारीला होणारा शनीचा भाग्य स्थानातील राशी प्रवेश भाग्यकारक ठरेल.

फेब्रुवारी :

भाग्य स्थान आणि दशम स्थानातील शुक्राचे भ्रमण मनाप्रमाणे यश देण्यास साहाय्यकारी ठरेल. कामकाजात नवी झेप घ्याल. नोकरी व्यवसायासाठी विशेष गुंतवणूक कराल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील. एखादे वेळी प्रत्यक्ष परदेशगमन झाले नाही तरी परदेशासंबंधीत कामे, करार करण्याचे योग आहेत. संधीचे सोने कराल. जोडीदारासह वैचारीक चर्चा रंगतील. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ मंडळींचा आधार घ्याल. रक्तातील घटकांचे प्रमाण बिघडेल. आहारावर नियंत्रण आवश्यक !

मार्च :

मंगळ मिथुन राशीत प्रवेश करत आहे. बुद्धीमत्तेचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. वाईट आणि चुकीच्या विचारांना वेळीच अटकाव करावा. विद्यार्थ्यांना गुरुजनांचा सल्ला, मार्गदर्शन कामी येईल. नोकरी, व्यवसायात बुध, गुरूच्या शुभ योगामुळे कामाला गती येईल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. जोडीदाराच्या कामाची समाजात वाहवा होईल. मुलाबाळांच्या उत्कर्षाच्या वार्ता समजतील. कामानिमित्त प्रवास कराल. राहू हर्षलसह शुक्राचे भ्रमण अनपेक्षित लाभ देणारे असेल. वातावरणातील बदलांमुळे श्वसनाचा त्रास संभवतो.

एप्रिल :

शनी मंगळाच्या शुभ योगामुळे धाडसी निर्णय घेऊ शकाल. या निर्णयाच्या परिणामांची आपणास पूर्वकल्पना असेलच. लाभ स्थानातील मेष राशीत २१ एप्रिलला गुरू प्रवेश करेल. गुरूसह राहू, हर्षल आणि रवीचे भ्रमण काही काळ अनिश्चितता दाखवेल. वैचारिक गोंधळ होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात कोणतेही मत मांडताना सावधगिरी बाळगावी. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कसून तयारी करावी. विवाहोत्सुक मंडळींनी २१ एप्रिलनंतर जोडीदाराचे संशोधन सुरू करावे. अपेक्षेप्रमाणे आणि आचार विचारांमध्ये समानता असणारा जोडीदार मिळेल.

मे :

नोकरीत बदल करू इच्छित असाल तर एप्रिलनंतरच्या मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता दाट आहे. नव्या ठिकाणी इतरांवर आपल्या ज्ञानाची छाप पाडाल. कामासंबंधीत परदेशाशी निगडीत बाबी मार्गी लागतील. सध्या रवी, राहू , हर्षलसह गुरू ग्रह आहे. या कालावधीत वैवाहिक नात्यासंबंधी मनात शंका- कुशंका येण्याची शक्यता आहे. अशा वेळी एकमेकांवरील विश्वासच कामी येईल. लक्षात ठेवा, सर्वगुणसंपन्न असे कोणीच नसते. विद्यार्थ्यांचे मन विचलित करणारे ग्रहयोग आहेत. उन्हाळी सर्दी, अपचन असे त्रास उदभवतील.

जून :

व्यवसाय ,उद्योगधंदा करणाऱ्यांना परदेशातील संधी उपलब्ध होतील. विवाहोत्सुकांच्या प्रयत्नांना यश मिळेल. विवाहीत दाम्पत्यांनी आपले गुण दोष एकमेकांपुढे मांडून नात्यात पारदर्शकता ठेवावी. विद्यार्थीवर्गाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करावे. धरसोडपणा टाळावा. गुंतवणूकदारांना आर्थिक लाभ होतील. स्थावर मालमत्तेच्या कामात अडचणी येतील. नोकरदारवर्गाला बदलीचे योग आहेत. संतती प्राप्तीच्या दृष्टीने वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेण्याची तयारी ठेवावी. मानसिक ताण घेऊ नये.

जुलै :

आपल्या राशीतील रवी बुधाचा योग आपली बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यांचे योग्य सादरीकरण करण्यासाठी पूरक आहे. स्वतःचे विचार चांगल्या प्रकारे व्यक्त केल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवाल. नोकरी व्यवसायात लाभदायक घटना घडतील. शुक्र मंगळाचा शुभ योग आवश्यक इतका आत्मविश्वास देईल. आर्थिक समस्या दूर होतील. विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळेल. जोडीदारासह खटके उडले तरी त्यांचे वादात रूपांतर होणार नाही. सामंजस्याने परिस्थिती हाताळाल. खांदे, दंड दुखावणे, मार लागणे संभवते.

ऑगस्ट :

तृतीय स्थानातील रवी, मंगळ, बुध आपल्यात आत्मविश्वास निर्माण करेल. परंतु त्याला मर्यादा ओलांडू देऊ नका. आर्थिक नियोजनाबाबत सतर्क राहावे. विद्यार्थ्यांना गुरुजनांचा पाठींबा ,आधार मिळाला तर उत्तम कामगिरी पार पडेल. नोकरी व्यवसायात आवश्यक तेथेच आपली ऊर्जा, वेळ आणि ज्ञान उपयोगात आणा. कौटुंबिक प्रश्न सोडवताना व्यवहारीपणा बाजूला ठेवा. सामंजस्याने घ्यावे. जोडीदाराच्या साथीने महत्वाचे निर्णय घ्याल. पोटाचे विकार बळावतील. औषधोपचार घ्यावा लागेल.

सप्टेंबर :

आपली विवेक बुद्धी जागरूक ठेऊन नात्याची वीण घट्ट करा. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त वा त्रस्त असेल. धीराने आणि सबुरीने घ्यावे. प्रश्न अलगद सोडवावे लागतील. स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री संबंधित बोलणी सुरू होतील. घाई करू नका. नोकरी व्यवसायात नवे करार करताना छुपे मुद्दे विशेष करून अभ्यासवेत. विद्यार्थी वर्गाला गुरू शनीची साथ लाख मोलाची ठरेल. आत्मविश्वासपूर्वक आगेकूच करावी. सातत्याने घेतलेले कष्ट फळास येतील. हाडे आणि स्नायूंसंबंधीत त्रास सहन करावा लागेल.

ऑक्टोबर :

रवी, मंगळ, केतू, बुध या ग्रहांच्या योगामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. अवतीभोवती असलेली अनेक प्रलोभने आपणास अस्वस्थ करतील. अशा वेळी लाभकारक गुरुचे साहाय्य मिळेल. नोकरी व्यवसायात देखील निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. वैवाहिक जीवनात एकमेकांची साथ उपयोगी पडेल. संतती प्राप्तीच्या बाबतचे प्रयत्न लांबणीवर पडतील. गुंतवणूकदारांनी थोडा संयम ठेवावा. वातावरणातील बदल, प्रदूषण यामुळे डोकं जड होणे, चक्कर येणे यावर औषधोपचार घ्यावा.

नोव्हेंबर :

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आपल्या आवडी आणि छंद जोपासण्यास वेळ काढाल. प्रवास योग येईल. नोकरी व्यवसायात काही अंदाज अगदी अचूक ठरतील. त्यानुसार अवलंब केल्यास मोठे नुकसान टळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास जरूर करावा. विवाहोत्सुक मंडळींना आपल्या जोडीदाराची निवड करणे सोपे जाईल. नातेवाईकांच्या मदतीसाठी हात पुढे कराल. परतफेडीची अपेक्षा नको. मूत्राशय, मूत्रपिंड यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

डिसेंबर :

२८ नोव्हेंबरला* आपल्या दशम स्थानात राहू प्रवेश करणार आहे. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने हा योग चांगला असेल. हिंमत आणि धडाडीने आपली कर्तव्ये पार पाडाल. पंचमातील स्वगृहीचा शुक्र प्रेमप्रकरणात यश देईल. तसेच सहवासातून प्रेम उत्पन्न होईल. बौद्धिक आणि कला क्षेत्रात प्रगती कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाईल. मजा मस्तीवर मर्यादा ठेवाव्याच लागतील. विवाहितांना एकमेकांच्या सहवासात आनंद मिळेल. कफ आणि पित्ताचा त्रास जाणवेल. जागरणे टाळा. आर्थिक दृष्टया स्थैर्य लाभेल.

हे ही वाचा<<

Taurus Yearly Horoscope 2023: वृषभ राशीसाठी यंदा श्रीमंतीचा योग कधी? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

Aries Yearly Horoscope 2023: मेष राशीला धनलाभ कधी होणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

एकंदरीत २०२३ या वर्षात अनावश्यक बोलणे टाळावे. वर्षभर वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. विवाहीत दाम्पत्यांना हे वर्ष आनंददायी जाईल. पण लक्षात असू द्या.. प्रत्येकात काही चांगल्या गोष्टी तर काही उणीवा या असणारच. जानेवारी ते एप्रिल हा कालावधी वाहनखरेदीसाठी अनुकूल आहे. प्रवासयोग देखील चांगले आहेत. थोड्या कालावधीत अधिक जवळीक साधणाऱ्या मित्रांवर अंधपणे विश्वास ठेवू नका. आपली समयसूचकता जागरूक ठेवा. नातेवाईक आपल्या अडचणीच्या काळात मदत करण्यास तयार असतील. भावंडांची प्रगती होईल. स्थावर मालमत्तेसंबंधित प्रश्न व त्या विषयीची कोर्टकचेरीची कामे एप्रिलपूर्वी पुढे सरकतील. सातत्य आणि कायदेशीर पाठपुरावा मात्र आवश्यक. वर्षभरात सतर्कता बाळगून आर्थिक गुंतवणूक कराल. अधिक फायदा मिळवण्यापेक्षा सुरक्षित गुंतवणूक दीर्घ काळाच्या दृष्टीने महत्वाची असेल. खोटी आश्वासने आणि तांत्रिक फसवणुकीपासून सावधान ! एप्रिल ते जुलै आर्थिकलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. डोळे कोरडे होणे, लाल होणे, चुरचुरणे, त्वचेला भेगा पडणे ,चट्टे (रॅश) येणे तसेच श्वासोच्छ्वासाबाबत विशेष काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम उपयोगी पडेल. कामाचा ताण घेतल्यास त्याचा झोपेवर परिणाम होईल. एकूण ग्रहमानाचा विचार करता आत्मविश्वासाची सीमा रेषा ओलांडली नाहीत तर हे वर्ष आनंदाचे जाईल. आर्थिक उन्नतीसह मानसिक समाधानही लाभेल.

Story img Loader