वैदिक ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्र, ९ ग्रह आणि १२ राशींचे वर्णन केले आहे. या राशीच्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगळे असते. ज्योतिषशास्त्रानुसार अश्या ३ राशीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्याशी संबंधित मुलींना पाककलेची खूप आवड असते. असे मानले जाते या राशीच्या मुलींवर अन्नपूर्णा मातेची विशेष कृपा असते. तसेच स्वयंपाकाच्या कौशल्यामुळे या मुली कोणाचेही मन सहज जिंकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष राशी

या राशीच्या मुलींना स्वयंपाकात अनेक पदार्थ तयार करायला खूप आवडतात. त्यांचा स्वभाव खूप मजेदार असून या राशीच्या मुली स्वयंपाकही आनंदाने करतात. या मुली धाडसी आणि निडरही आहेत आणि जोखीम पत्करायलाही त्या नेहमी तयार असतात. या राशीच्या मुली त्यांच्या स्वयंपाकाच्या कौशल्याने पती आणि सासरच्या लोकांची मने जिंकतात. या राशीचा स्वामी मंगळ आहे, जो त्याच्यावर हे गुण देतो.

कर्क राशी

या राशीच्या मुलींना स्वयंपाकाची खूप आवड असते. या मुली खूप भावूक असतात. तसेच या राशीच्या मुलींना भांडणं झालेली अजिबात आवडत नाही. घरातील कामे करण्यातही त्या पटाईत असतात आणि स्वयंपाकाचे कामही उत्तम प्रकारे हाताळतात. त्यांच्याकडे स्वादिष्ट चमचमीत जेवण करण्याची एक वेगळीच कला आहे. यासोबतच नवनवीन पदार्थ बनवतात. तसेच या मुली प्रत्येकाच्या मनात सहज स्थान निर्माण करतात. पतीसाठीही ती भाग्यवान मानली जाते.

कन्या राशी

या राशीच्या मुली थोड्या भावूक असतात आणि त्या त्यांचे कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतात. या राशीच्या मुली प्रत्येक नातेसंबंध पूर्ण आनंदाने जोडण्याचा व जोपासण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांच्या पतीसाठी व घरातील सर्व सदस्यांना चांगले खाऊ घालणे, त्यांच्यासाठी नवीन पदार्थ बनवणे खूप आवडते. हे काम या राशीच्या मुली अत्यंत चोखपणे करतात, म्हणूनच या राशीच्या मुली जिथे राहतात तिथे त्या सर्वांच्या लाडक्या असतात. या राशीचा स्वामी बुध आहे, जो त्याच्यावर हे गुण देतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls of these 3 zodiac signs are often skilled in cooking know about yours scsm