हिंदू धर्मात सर्व देवी-देवतांमध्ये लक्ष्मीला धन-संपत्तीची देवी आणि कुबेराला धनाचा देवता म्हटले गेले आहे. देवी लक्ष्मीला सुख-समृद्धी, धन, ऐश्वर्य यांचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मीची कृपा असल्यावर मनुष्याला जीवनातील सर्व सुख सुविधा सहज प्राप्त होतात असे मानले जाते. ज्या लोकांवर लक्ष्मीचा आशीर्वाद असतो ते लोक नेहमी सुखी जीवन व्यतीत करतात. शास्त्रांमध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे आणि तिची कृपा मिळवण्याचे अनेक उपाय सांगितले गेले आहेत. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही उपाय आहेत, ज्याचा अवलंब केल्याने तुम्हीही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकता आणि जीवनात ऐश्वर्य आणि सुख-समृद्धी मिळवू शकता.
- शास्त्रांमध्ये असे सांगण्यात आले आहे की ज्या ठिकाणी स्वच्छता असते अशाच ठिकाणी लक्ष्मी वास करते. ज्या घरांमध्ये स्वच्छता आणि साजसजावट केलेली असेल त्या घरात लक्ष्मी लगेचच निवास करते. म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवावे. ज्या घरांमध्ये स्वच्छता नसते आणि घराच्या मुख्य दारावर नेहमी घाण किंवा जोडे आणि चप्पल पडलेल्या असतात त्या घरांमध्ये माता लक्ष्मी वास करत नाही.
घरात नकोशी असलेली पाल धर्मशास्त्रानुसार असते शुभ, जाणून घ्या
- ज्या घरांमध्ये खरकटी भांडी अनेकदा इकडे तिकडे पडून असतात अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही. वास्तुशास्त्रानुसार अशा घरांवर माता लक्ष्मी कोपते आणि तिथून आपली कृपा काढून घेते.
- अशीही मान्यता आहेत की ज्या घरांमध्ये झाडूची विशेष काळजी घेतली जाते, तेथे माता लक्ष्मी वास करते कारण झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आपल्या घरातील झाडूकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घरामध्ये कोणाचीही नजर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावी. शिवाय झाडूला कधीही पायाने स्पर्श करू नये. तसेच संध्याकाळच्यावेळी घरात झाडू मारू नये. असे मानले जाते की झाडूचा अपमान केल्याने धनाची हानी होते आणि अशा घरांना लक्ष्मी कायमची सोडून जाते.
तुमची पैशांची तिजोरी घराच्या ‘या’ दिशेला तर नाही ना? वायफळ खर्चात होऊ शकते वाढ
- वास्तुशास्त्रांनुसार उत्तर दिशेला लक्ष्मी आणि कुबेराची दिशा मानले गेले आहे. या दिशेची विशेष काळजी घेतल्यास धनप्राप्ती होते. देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिशेला कधीही जड आणि निरुपयोगी टाकू नयेत. या दिशेच्या स्वच्छतेमुळे घरात धन-समृद्धी येते.
- ज्या घरांमध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि शंख यांची सकाळ संध्याकाळ नित्य पूजा केली जाते त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)