Lakshmi’s Favourites : हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धन वैभवाची देवी मानतात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक अडचण दूर होते आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळते तसेच धनलाभ मिळू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, माता लक्ष्मीच्या काही प्रिय राशी आहेत, ज्याच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा दिसून येते. तसेच काही जन्मतारीख असतात ज्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा दिसून येते.

जन्म तिथीच्या आधारावर भविष्याविषयी जाणून घ्यायचे असेल तर अंकशास्त्राचा आधार घेतला जातो. याला मूलांक असे म्हणतात. अंकशास्त्रानुसार, मूलांक हे १ ते ९ पर्यंत असतात. याच्या आधारावर जन्मतिथीवरून भविष्याविषयी जाणून घेता येते. आज आपण लक्ष्मीच्या प्रिय मूलांक विषयी जाणून घेणार आहोत.

मूलांक ६ चा स्वामी ग्रह शुक्र आहे. या मूलांकवर माता लक्ष्मीची कृपा दिसून येते. शुक्र देवाला धन, वैभव, ऐश्वर्य आणि मान सन्मानाचा कारक मानले जाते. ज्या लोकांचा जन्म ६, १५, किंवा २४ तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक ६ असतो. या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा दिसून येते.

प्रसिद्धी कमावतात

मूलांक ६ असलेले लोक आपल्या कामाप्रति खूप प्रामाणिक असतात आणि खूप जास्त क्रिएटिव्ह असतात. याच कारणाने ते आयुष्यात खूप प्रसिद्धी कमावतात. या मूलांकचे लोक कला, संगीत, नृत्य, नाटक, गायन, फॅशन पासून सामाजिक कार्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करतात.

खूप जास्त रोमँटिक असतात

मूलांक ६ चा स्वामी ग्रह प्रेम, आकर्षणाचा कारक शुक्र देव असतो. अशात या मूलांकचे लोक खूप जास्त रोमँटिक असतात. हे लोक अनेकदा प्रेमात पडतात. ते कोणालाही खूप सहज प्रपोज करतात.

खूप जास्त पैसा खर्च करतात

मूलांक ६ असलेल्या लोकांजवळ कधीही पैशाची कमतरता भासत नाही. अशात हे लोक पैसा खर्च करताना कधीही मागे पुढे पाहत नाही. हे लोक अजिबाज कंजुष नसतात.

फिरायला आवडते

या लोकांना फिरायला खूप आवडते. याच कारणाने हे लोक नेहमी कोणत्या ना कोणत्या ट्रिपवर जातात.

स्वभावाने खूप शांत असतात

या मूलांकचे लोक खूप जास्त क्रिएटिव्ह स्वभावाचे असतात. ते कला प्रेमी असतात ते स्वभावाने खूप शांत असतात. ते वादविवादांपासून खूप दूर राहतात.

Story img Loader