ज्योतिष शास्त्रात प्रत्येक धातूचे गुणधर्म आणि परिणाम सांगितले आहेत. यामुळे सोने परिधान करणे शुभ मानले जाते. याशिवाय कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी सोने, चांदी किंवा इतर धातूंमध्ये अनेक रत्ने घालण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, बहुतेक रत्ने सोन्याबरोबर परिधान केली जातात. चला जाणून घेऊया सोन्याचे दागिने परिधान करण्याचे फायदे आणि कोणत्या राशीच्या लोकांनी सोने घालू नये.

सोन्याचे ज्योतिषीय महत्त्व

ज्योतिषशास्त्रात सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी सांगितला आहे. वास्तविक, सोन्यावर गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. अशा स्थितीत हे धातू धारण केल्याने गुरू ग्रह मजबूत होतो आणि जीवनात ऐश्वर्य, वैभव आणि सुख-समृद्धी येते.

People of these 3 zodiac signs of water element are ahead of others in knowledge and intelligence
जल तत्व असलेल्या ‘या’ ३ राशींचे लोक असतात इतरांपेक्षा ज्ञानी आणि उदार; कशी असते यांची लव्ह लाइफ?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Mangal Pushya Yog 2025
ग्रहांचा सेनापती मंगळ करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश! ‘या’ राशींचे लोक जगतील ऐशो-आरामाचे जीवन; अचानक होईल धनलाभ
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Budh, Shani & Surya Align After 100 Years!
१०० वर्षानंतर बुध, शनि अन् सूर्याचा एकत्र संयोग, या तीन राशींना प्रचंड धनलाभ, मिळणार अपार पैसा

आणखी वाचा : “एक दिवस तुझं भांड फुटणार, जसं ऐश्वर्याने…”, सलमान खानला पाकिस्तानी अभिनेत्रीने दिली धमकी

या राशींसाठी सोने लाभदायक आहे

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. त्यातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. तसेच कर्जातून मुक्ती मिळते.

आणखी वाचा : “बॉलिवूडमध्ये एकतरी काळी अभिनेत्री दाखवा…”, नवाजुद्दीन सिद्दीकीने केलेले वक्तव्य चर्चेत

सिंह (Leo)

या राशीसाठी सोनं फायदेशीर ठरू शकते. वास्तविक या राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे. सूर्य आणि गुरू ग्रह यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे या राशीच्या व्यक्तीने सोनं परिधान करावे.

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठीही सोनं लाभदायक असल्याचे सांगितले जाते. या राशीचे लोक सोनं धारण करून भरपूर यश मिळवू शकतात. तसेच आर्थिक स्थितीही देखील चांगली राहते.

आणखी वाचा : या ४ अक्षरांच्या स्त्रिया पतीला बनवतात श्रीमंत, जाणून घ्या त्यांच्याविषयी

धनु (Sagittarius)

या राशीचा स्वामी गुरु असून सोन्याचा त्याचा गुरु ग्रहासोबत याविशेष संबंध असल्याचे मानले जाते. या राशीच्या व्यक्तीने सोने परिधान करणे शुभ असते. तसेच त्यांना प्रत्येक कामात यश मिळते.

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून जाणून घ्या तुमचे व्यक्तीमत्त्व

कोणत्या राशीच्या लोकांनी सोने घालू नये?

ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सोने घालू नये. दुसरीकडे, तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी जास्त प्रमाणात सोन्याचे दागिने घालू नयेत.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader