Surya and Mangal Yuti 2023 : सध्या तूळ राशीमध्ये ग्रहांचा राजा सुर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांची युती झाली आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्मा, पिता, तेज आणि शक्ती इत्यादींचा कारक मानला जातो. तर मंगळ हा धैर्य, मेहनत आणि शक्तीचा कारक मानला जातो. मंगळ १६ नोव्हेंबरपर्यंत आणि सूर्य १७ नोव्हेंबरपर्यंत तूळ राशीमध्ये विराजमान असणार आहेत. यानंतर हे दोन्ही ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करतील. अशा स्थितीत तूळ राशीमध्ये सूर्य आणि मंगळाची युती १६ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. तर ही युती कोणत्या राशींसाठी फायदेशीर आणि लाभदायक ठरणार आहे ते जाणून घेऊया.
मेष रास
मंगळ आणि सूर्याची युती मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देणारी ठरु शकते. १६ नोव्हेंबरपर्यंत या राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळू शखते. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. सूर्य आणि मंगळ एकत्र आल्याने मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच व्यावसायिकांसाठी देखील हा काळ लाभदायक ठरु शकतो.
सिंह रास
सूर्य आणि मंगळ युतीमुळे सिंह राशीच्या लोकांना प्रचंड आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुमचे नशीब पालटण्याची शक्यता आहे. सूर्य-मंगळ युतीचे तुम्हाला अनेक शुभ परिणाम मिळू शकतात. सूर्याचा प्रभाव आणि मंगळाच्या धाडसीपणासह, सिंह राशीच्या लोकांना चर्चेत आणू शकतो. या काळात तुमसाठी पैशाचे अनेक स्त्रोत उपलब्ध होऊ शकतात.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीचे लोक या काळात पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकतात. वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी धैर्यवान आणि उत्साही राहावे लागू शकते. विरोधकांचा पराभव करु शकता. या काळात तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे. सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)