Four Rajyog In Kundli: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी भ्रमण करून राजयोग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर दिसून येतो. यासोबतच या योगांचा प्रभाव काही व्यक्तींवर नकारात्मक तर काहींवर सकारात्मक असतो. तब्बल २० वर्षांनंतर ४ ‘धन राजयोग’ तयार होत आहेत. या राजयोगांची नावे सत्कीर्ती, हर्ष, भारती आणि ज्येष्ठ अशी आहेत. हे राजयोग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकतील. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांना या राजयोगांच्या प्रभावामुळे लाभ आणि प्रगतीची शक्यता निर्माण होत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकर राशी

४ ‘धन राजयोग’ बनल्याने तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तसंच कनिष्ठ आणि वरिष्ठांची साथ मिळू शकते. त्याचबरोबर शनिदेवही तुमच्या कुंडलीत धनाच्या घरावर भ्रमण करत आहेत. आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच जे लोक परदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. त्याचबरोबर अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. यावेळी व्यावसायिकांना पैशाची बचत आणि गुंतवणूक करण्यात यश मिळेल. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

मिथुन राशी

४ ‘धन राजयोग’ तयार झाल्याने मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी भाग्य तुमच्या सोबत असेल. तसेच, हा काळ स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट ठरू शकतो. ते कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात. त्याच वेळी, आपण काम आणि व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता. या काळात विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. दुसरीकडे कुंभ राशीतील शनिदेवाच्या संक्रमणामुळे तुम्हाला शनिदेवाच्या साडेसतीपासून मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे जी कामे तुमच्याकडून होत नव्हती ती आता पूर्ण होऊ लागतील. यासोबतच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

( हे ही वाचा: शनिदेव उच्चस्थानी करतील गोचर; ‘या’ ३ राशींचे सुरू होतील ‘अच्छे दिन’, मिळू शकतो भरपूर पैसा)

कन्या राशी

तुमच्यासाठी ४ ‘धन राजयोग’ बनणे आर्थिक आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने शुभ सिद्ध होऊ शकते. कारण १५ फेब्रुवारीनंतर तुमच्या संक्रमण कुंडलीत मालव्य राज योग तयार होईल. यासोबतच शनिदेव तुमच्या राशीतून सहाव्या स्थानात भ्रमण करत आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच विवाहित लोकांच्या जीवनात आनंदात वाढ होईल. तुम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. पार्टनरशिपच्या कामातही तुम्हाला चांगले यश मिळू शकते.