ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जीवनातील घटनांचा अंदाज लावला जातो. ग्रहांच्या संक्रमणाच्या आधारे येणाऱ्या काळात माणसाच्या आयुष्यात काय घडेल याचा अचूक अंदाज बांधता येतो. ज्योतिषीय गणनेच्या आधारे जाणून घेऊया, येणारा काळ कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. तसंच कोणत्या राशींना या वर्षात धनलाभाची संधी मिळेल..

वृषभ राशी (२० एप्रिल ते २० मे)

या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक महत्वाचे बदल घडून येतील. तुमच्या करिअरमध्ये लवकरच प्रगती होण्याची चिन्हे आहेत. यासोबतच तुमची आर्थिक स्तिथी सुधारण्याची देखील शक्यता आहे.तुम्हाला तुमच्या निर्णयांवर आणि कृतींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, या काळात तुम्ही स्वतःला कोणत्याही अनावश्यक कामात गुंतवण्यापासून परावृत्त केले पाहिजे.

budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Vasant Panchami 2025
Vasant Panchami 2025 : २ फेब्रुवारीपूर्वी चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शनि, सूर्य, गुरूसह ५ ग्रहांच्या कृपेने आर्थिक लाभासह होईल करिअरमध्ये झपाट्याने प्रगती
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Surya Shani Yuti 2025
Surya Shani Yuti 2025: पिता-पुत्रांची होणार युती, सूर्य-शनिचा दुर्लभ योग ‘या’ चार राशींना देईल बक्कळ धनलाभ? गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
february 2025 grah gochar budh surya mangal gochar
फेब्रुवारीमध्ये ‘या’ ४ राशींची होईल चांदीच चांदी! अचानक धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग

कर्क राशी (२२ जून ते २२ जुलै)

तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात तुमचे १००% देणे आवश्यक आहे. त्याचा परिणाम तुमच्या बाजूने दिसून येईल. अशा स्थितीत समाजातील किंवा आजूबाजूचे लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. या काळात तुम्हाला लांबचा प्रवास करण्याची संधी चालून येईल. हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल.

सिंह राशी (२३ जुलै ते २२ ऑगस्ट)

हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांना नवीन मार्ग मिळू शकतात. तसंच या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्ही एखादे नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या देखील चांगला राहील. तसंच कुटुंबासोबत देखील चांगले संबध होऊ शकतात.

( हे ही वाचा: ३० वर्षांनंतर शनि-शुक्र बनवणार अद्भुत योग! ‘या’ ४ राशींचे नशिब अचानक पालटणार, मिळू शकतो प्रचंड पैसा)

कन्या राशी (२३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर)

हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला राहील. या काळात तुम्हाला अचानक काही संधी चालून येतील आणि त्या संधीचा फायदाही होईल. ती संधी स्वीकारण्यापूर्वी जास्त विचार करू नका. तसंच आठवड्याच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्राकडून चांगली साथ मिळेल.

वृश्चिक राशी (२४ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर)

या काळात भूतकाळातील काही गोष्टीतून सुटका होण्याची शक्यता आहे. यावेळी तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल आणि यामुळेच बरीच कामे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी देखील बढती होण्याची शक्यता दिसत आहे.

धनु राशी (२२ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर)

हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळतील. तसंच धनलाभ देखील होण्याची शक्यता दिसत आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल तर या काळात तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता दिसत आहे. तसंच वरिष्ठांकडून तुम्हाला मानसन्मान देखील मिळेल. तुम्ही एखाद्या नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात करू शकता. त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: ७ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनि- गुरूच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा)

मकर राशी (२२ डिसेंबर ते १९ जानेवारी)

हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला जवळच्या मित्राची साथ मिळेल त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक दृष्ट्या देखील हा काळ खूप चांगला असेल. तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला पैसे मिळू शकतात, अशा स्थितीत कुठेतरी अडकलेले पैसेही मिळू शकतात.

Story img Loader