Grah Gochar 2025 : वैदिक पंचांगानुसार, ग्रह ठराविक काळानंतर राशी किंवा नक्षत्र बदल करत असतात, ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम १२ राशींच्या जीवनावर होतो. यात शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी शुक्र ग्रह शताभिषा नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. पूर्वा भाद्रपद नक्षत्राचा स्वामी देवगुरु गुरु आहे, यामुळे शुक्राच्या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण, १२ पैकी तीन राशींच्या लोकांचे नशीब या काळात फळफळू शकते. त्यांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ होऊ शकते. चला तर मग या भाग्यवान राशींविषयी जाणून घेऊ…
शुक्राचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश ‘या’ राशींना करेल श्रीमंत, नोकरी व्यवसायात होईल प्रगती (Grah Gochar 2025 )
मीन
शुक्राचा शताभिषा नक्षत्रातील प्रवेश मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येऊ शकते. व्यवसायात मोठा नफा आणि गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तिथे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, तसेच स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ आहे. त्यांना काही परीक्षांमध्ये यश मिळू शकते. अविवाहित लोकांना लग्नासाठी स्थळे येऊ शकतात. आरोग्य चांगले राहील. तसेच यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा नक्षत्र बदल अनुकूल ठरू शकतो. यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. त्याच वेळी बेरोजगारांसाठी नोकऱ्यांबाबत चर्चा होऊ शकते. तुम्हाला नोकरीदेखील मिळू शकते. त्याच वेळी तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तसेच या काळात तुमचे मोठ्या लोकांशी संबंध निर्माण होतील. नोकरी आणि व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवासाची संधी मिळेल, ही संधी तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडून आणू शकते.
तुळ
शुक्र ग्रहाचा नक्षत्र बदल तुळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्ही काही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. तसेच तुमचा तुमच्या जोडीदाराशी समन्वय वाढेल आणि प्रेमसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळेल. दैनंदिन उत्पन्नात वाढ होऊ शकते. तसेच व्यापार वर्गातील लोकांना चांगल्या ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो.