ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबरमध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. पुढील महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि शनि यांसारखे शक्तिशाली ग्रह त्यांच्या राशी बदलतील. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्ती आणि वैभवाचे प्रतिक शुक्र हे दोघेही मार्गस्थ होणार आहेत. दोन्ही राशींचा प्रभाव सर्व १२ राशींवर वेगवेगळा असेल, पण ४ राशी अशा आहेत, ज्यांच्यासाठी हे अतिशय फायदेशीर ठरु शकते. त्यांना आयुष्यात सुख, समृध्दी आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
सप्टेंबरमध्ये ‘या’ राशींचे भाग्य चमकणार?
वृषभ
तुमच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती अनुकूल राहू शकते. या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूप लाभदायी ठरु शकतो. कमाईचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. सप्टेंबरमध्ये तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. अचानक धनलाभही होऊ शकतो. कुटुंबाकडून तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते.
मिथुन
शुक्राच्या प्रभावामुळे सप्टेंबरमध्ये मिथुन राशीतील मंडळीचा आत्मविश्वास वाढू शकतो. नशीब तुम्हाला खूप साथ देऊ शकतो. इच्छित जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुखद बातमी ऐकायला मिळू शकते. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते.
(हे ही वाचा : Vastu Tips Diya: घरात ‘या’ दिशेला दिवा लावल्याने लक्ष्मी येते दारी? शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा )
तूळ
शुक्र संक्रमणामुळे तूळ राशीतील खाजगी किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. सप्टेंबरमध्ये पैशाची कमतरता दूर होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीतील लोकांना सप्टेंबरमध्ये चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वैवाहिक जीवन सुखकर राहू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्तावही येऊ शकतात
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)