Grah Gochar March 2025 Effect: मार्च महिन्यात दोन पावरफुल गोचर दिसून येणार आहे. सूर्य देव आपल्या राशीमध्ये परिवर्तन करत मीन राशीमध्ये गोचर करणार आहे. तर शनि देव सुद्धा मीन राशीमध्ये गोचर करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनि हे पिता पुत्र आहेत. अशात दोन महाशक्तीशाली गोचरमुळे राशीचक्रातील इतर राशींवर याचा परिणाम दिसून येईल. जाणून घेऊ या दोन गोचरचा कोणत्या तीन राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल.

सूर्य गोचर २०२५ (Surya Gochar 2025)

ज्योतिषशास्त्रानुसार, शतभिषा नक्षत्रामध्ये ३ मार्च पर्यंत सूर्य देव राहणार आणि ४ मार्च ला नक्षत्र परिवर्तन करणार. तसेच सूर्य मीन राशीमध्ये राशि परिवर्तन करणार आहे. आता सूर्य कुंभ राशीमध्ये विराजमान आहे.

शनि गोचर २०२५ (Shani Gochar 2025)

मार्च २०२५ मध्ये शेवटी म्हणजेच २९ मार्च रोजी शनिदेव आपली राशी बदलणार आहे ज्याचा थेट परिणाम तीन राशींवर दिसू शकतो. शनिदेव मीन राशीमध्ये गोचर करून कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांवर विशेष प्रभाव पडू शकतो. या तीन राशींच्या लोकांवर सूर्य आणि शनि या दोन्ही ग्रहाच्या गोचरचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो. या दरम्यान शनिच्या साडेसातीपासून काही लोकांची सुटका होऊ शकते.

मेष राशी (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्यात निर्माण होणारा गोचर शुभ ठरू शकतो. अडकलेले काम मार्गी लागतील. जुन्या योजनांवर काम करू शकता. या लोकांना व्यवसायात वृद्धी होऊ शकते. नोकरी मध्ये प्रमोशन मिळू शकते. मोठे निर्णय घेऊ शकतात. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. पैसा कमावण्याचे नवीन मार्ग उघडतील. जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. प्रवासाचे योग जुळून येईल.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांना मार्च महिन्यात सूर्य आणि शनि ग्रहाचा गोचर शुभ प्रभाव पडू शकतो. आर्थिक स्थितीमध्ये अचानक सुधारणा येऊ शकते. धन कमावण्याचे नवीन मार्ग उघडतील. कामाच्या ठिकाणी खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल पण दुप्पट फळ मिळेल. आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. व्यवसायात प्रगती होऊ शकते.

मीन राशी (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्यात होणारा गोचर खूप जास्त लाभदायक ठरू शकतो. या लोकांना विशेष सुख सुविधा मिळू शकते. विवाहाशी संबंधित अडचणी दूर होतील. मनाप्रमाणे जोडीदार मिळू शकतो. ऑफिसमध्ये सहकार्य मिळू शकते. या दरम्यान मन प्रसन्न राहू शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम राहीन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader