ज्योतिषशास्त्रात ग्रहांची युती महत्वाची मानली जाते. ग्रहांच्या युतीचा काही राशींवर शुभ परिणाम होतो तर काहींवर अशुभ परिणाम होतो. यावेळी सूर्य बुध मकर राशीत आणि शनि शुक्र कुंभ राशीत विराजमान आहेत. सूर्य, बुध आणि शुक्र शनिची युती काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी हा काळ नोकरी व्यवसायासाठी वरदान ठरू शकतो. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. यासोबतच तुमचे वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. तुम्ही या काळात कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवाल. तसंच या काळात तुम्हाला गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. तसंच तुमच्या घरात धार्मिक कार्य पार पडण्याची देखील शक्यता आहे.

कर्क राशी

कर्क राशीसाठी येणारा काळ फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना यावेळी पदोन्नती किंवा पगार वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचं यावी कौतुक होईल. तसंच याकाळात तुम्हाला धनलाभ देखील होईल. ज्यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. ज्यामुळे तुमचे आधीपासून सुरू असलेले मतभेद दूर होतील.

( हे ही वाचा: शनिपुत्र आदित्यचा कुंभ राशीत सर्वात मोठा प्रवेश; ‘या’ होणार श्रीमंत? मिळू शकतो बक्कळ पैसा)

सिंह राशी

सिंह राशीसाठी येणारा काळ फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसंच तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तसेच कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तसंच जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grah yuti horoscope shani venus surya mercury transist 2023 these zodiac sign can get more money gps