March 2023 Lucky Zodiac Signs: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करतात. मार्चमध्ये ४ ग्रहांच्या हालचालीत काही बदल होणार आहे. त्यानुसार मंगळ ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार तर शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. शिवाय १५ मार्चला सूर्यदेव मीन राशीत गोचर करणार असून दुसऱ्याच दिवशी बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार या महिन्यात होळी, चैत्र नवरात्री, गुढीपाडवा असे शुभ योग सुद्धा घडून येत आहेत. ग्रहांची स्थिती व शुभ मुहूर्तांमुळे येत्या महिन्याभरात ४ राशींसाठी अत्यंत शुभ काळ सुरु होत आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ४ राशींना धनलाभाचे व प्रगतीचे प्रबळ योग मिळणार आहेत. या राशी कोणत्या व त्यांना मार्च महिन्यात नेमका काय व किती लाभ होणार हे जाणून घेऊयात..
मार्च २०२३ मध्ये ‘या’ ४ राशी होणार अपार श्रीमंत?
वृषभ (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या मंडळींसाठी मार्च महिन्यात करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत, तुम्ही ज्या गोष्टीचा विचार कराल व मेहनत घ्याल त्या पूर्ण होण्यासाठी नशिबाची साथ लाभेल. व्यव्यसायात तुमच्या आर्थिक मिळकतीचे मार्ग विस्तृत होऊ शकतात. प्रेमाची साथ सुद्धा लाभेल. जुन्या आजारातून सुटका होऊ शकते. विवाह इच्छुक मंडळींना लग्नाचे योग आहेत. गुढीपाडव्याच्या आधी १३ मार्च ला मंगळ ग्रह वृषभ राशीतुन मिथुन राशीत मार्गी होणार आहे मात्र मंगळाच्या प्रभावाने वृषभ रासही आर्थिक समृद्धी अनुभवू शकते.
कन्या (Virgo Zodiac)
कन्या राशीच्या मंडळींसाठी नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी पगारवाढ व पदोन्नतीचे योग आहेत. धनलाभ होऊ शकतो मात्र त्यासह खर्च सुद्धा वाढू शकतो. प्रेमाची साथ लाभल्याने मानसिक ताण- तणाव दूर होऊ शकतो. आपल्या जोडीदारासह आनंदाचे क्षण अनुभवता येतील.
हे ही वाचा<< एकनाथ शिंदेंच्या हाती गूढ माहिती असल्याने आता विरोधक..ज्योतिष तज्ज्ञांचं भविष्यवाणीतून मोठं भाकीत
तूळ (Libra Zodiac)
मार्च महिन्याच्या सुरुवातीला तूळ राशीच्या भाग्यात आर्थिक प्रगतीचे योग आहेत. होळीच्या आधीच तुम्हाला एखादा मोठी व आनंदाची बातमी मिळू शकते. आपल्या कामावर निढळ श्रद्धा ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रामाणिकपणाची कास धरा. तुम्हाला काही महत्त्वाचे गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे लागतील. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या. महिलांना जोडीदाराकडून मोठं सरप्राईज मिळू शकते.
हे ही वाचा<< महालक्ष्मी राजयोग बनल्याने ३ राशींना होणार बलाढ्य धनलाभ? होळीआधी ग्रह युती होताच तुम्हीही व्हाल श्रीमंत?
धनु (Sagittarius Zodiac)
मासिक राशिभविष्यानुसार धनु राशीच्या मंडळींसाठी मार्च महिना अत्यंत आनंदांचा व अनुकूल असणार आहे, करिअरमध्ये स्थैर्य अनुभवता येईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूकीचा प्रचंड प्रबळ योग आहे. यामुळे येत्या काळात पैसे कमावण्याची संधी आहे. गुढीपाडव्याच्या आधीच तुम्हाला नव्या गुंतवणुकीची मोठी संधी मिळेल यावेळी सतर्क राहून निर्णय घ्या.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)