Gudhi Padwa 2024 : हिंदू धर्मामध्ये चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून हिंदू नवीन वर्षाची सुरूवात होते ज्याला आपण गुढी पाडवा म्हणतो. आज पासून नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. विशेष म्हणजे या शुभ मुहूर्तावर काही राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगाचा सर्वत्र परिणाम दिसून येईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्र मेष राशीमध्ये असेल ज्यामुळे चंद्र आणि गुरूबरोबर युती करून गजरकेसरी योग निर्माण करतील.शनि कुंभ राशीत असल्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल. याबरोबर मीन राशीमध्ये शु्क्र आणि बुध हे दोन ग्रह एकत्र येणार त्यामुळे लक्ष्मा नारायण राजयोग निर्माण होऊ शकतो. हे राजयोग शुभ वार्ता देऊ शकतात. काही राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या.
मेष राशी (Aries Zodiac)
मेष राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात यश मिळू शकते. या लोकांची धन संपत्ती वाढेल. गुंतवणूक करायची असेल तर या लोकांसाठी ही वेळ उत्तम आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी शुभ काळ आहे. या लोकांची जबाबदारी वाढू शकते.
हेही वाचा : Gudhi Padwa 2024: साडेतीन मुहूर्त कोणते? गुढीपाडव्याशिवाय ‘या’ अन्य अडीच दिवसांचं महत्त्व काय?
सिंह राशी (Leo Zodiac)
सिंग राशीच्या लोकांवर देवी दुर्गेची विशेष कृपा राहील. या लोकांना कामामध्ये अडचणी येत असतील त्या दूर होतील. नवीन नोकरी मिळू शकते. या लोकांची पगारवाढ होऊ शकते. हे लोक कर्जमुक्त होतील. जर घरात वादविवाद सुरू असेल तर तो संपुष्टात येईल. व्यवसाय क्षेत्रात मोठी संधी मिळू शकते.
कुंभ राशी (Aquarius Zodiac)
कुंभ राशीच्या लोकांवर देवी दुर्गेसह शनिदेवाची विशेष कृपा दिसून येईल. ज्या लोकांना नवीन घर किंवा वाहन खरेदी करायचं आहे त्यांना यश मिळू शकते. धन संपत्तीचा लाभ घेता येईल. घर कुटूंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय सुरू करण्यासाठी हा एक चांगला पर्याय असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)