Gudi Padwa 2024 Date, Time, Puja Vidhi, Rituals and Significance : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषत: महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, गुढी पाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जात. यंदा हा सण मंगळवारी ९ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो. यामुळे गुढीपाडवा हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो, शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व जाणून घेऊ…

गुढी पाडव्याची तारीख (Gudi Padwa 2024 Date)

यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी ९ एप्रिल रोजी येत आहे. अशा परिस्थितीत यंदा ९ मार्चा रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त (Gudi Padwa 2024 Shubh Muhurat)

हिंदी दिनदर्शिकेनुसार, गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त ८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू होत आहे. तेव्हा फाल्गुन अमावस्या संपल्यानंतर चैत्र महिन्याची सुरुवात होईल. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत ही तिथी राहील. अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवार, ९ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.

गुढीपाडव्याचे महत्व (Gudi Padwa 2024 Importance)

महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक यासणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करुन मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्याची पूजा करतात. काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल, पिवळे, भगवे रेशमी कापड बांधले जाते. फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते. यासह साखरेचे तोरण आणि कडुलिंबाची टाळ बांधली जाते. यानिमित्ताने घरासमोर फुलांचे तोरण, रांगोळी काढल्या जातात. घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते असे मानले जाते. गुढी पाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी लोक नवीन घर, गाडी किंवा नव्या कामांची सुरुवात करतात.

महाराष्ट्रभर ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात. मुंबई, पुणे, ठाणे यासह अनेक ठिकाणच्या शोभा यात्रा या नेहमी चर्चेचा विषय असतात. अनेक महाराष्ट्रीय तरुण, तरुणी या सणानिमित्ताने पारंपारिक मराठमोळ्या गेटअपमध्ये शोभा यात्रांमध्ये सहभागी होतात. लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात. पण केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.

Story img Loader