Gudi Padwa Vishesh Horoscope : ३० मार्च २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंतराहील. संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत इंद्र योग जुळून येईल. तसेच रेवती नक्षत्र दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहील. आज राहू काळ ४ वाजता सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज ३० एप्रिल २०२५ रोजी हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. म्हणजेच उद्या गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. या दिवशी दारात रांगोळी, दाराला तोरण, तर गुढी उभारून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जाईल. तर गुढीपाडव्याचा सण तुमच्यासाठी पुरणपोळी आणि श्रीखंड-पुरी सारखा गोडधोड जाणार का? हे आपण जाणून घेऊया…
३० मार्च पंचांग व राशिभविष्य ( Gudi Padwa Vishesh Mesh To Meen Horoscope ) :
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घ्याल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या वस्तु खरेदी कराल. झोपेची तक्रार कमी होईल. हातात नवीन अधिकार येतील.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
कर्तृत्वाची योग्य जाणीव ठेवाल. आध्यात्मिक गोष्टींत प्रगती करता येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल. तात्विक गोष्टींवर मतभेद संभवतात. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
नाटक सिनेमा पहायला जाल. छंद जोपासला वेळ मिळेल. लहान सहान दुखण्याकडे दुर्लक्ष नको. काही कामे अधिक वेळ घेतील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. स्त्रियांशी मैत्री वाढेल. घरगुती वातावरण खेळीमेळीचे राहील. तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहील. वरिष्ठांना नाराज करू नका.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
पित्त विकार बळावू शकतात. सहकुटुंब जवळचा प्रवास कराल. निसर्गाच्या सान्निध्यात रमून जाल. सौंदर्यप्रसाधनेच्या वस्तु खरेदी कराल. तुमच्यातील चांगल्या गुणांची दाखल घेतली जाईल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
कौटुंबिक सौख्य वाढेल. जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. संपर्कातील लोकांची गाठ घेता येईल. मनाची विशालता दाखवाल. उच्च रहाणीमानाची आवड जोपासाल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यवसायातून चांगला धनलाभ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. घरातील गोष्टींमध्ये लक्ष घालावे. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
मानसिक चांचल्य जाणवेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. मुलांशी मतभेद संभवतात. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. काहीसा आळशीपणा जाणवेल. जवळचे नातेवाईक भेटतील. योग्य संधीची वाट पहावी लागेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
उगाच चिडचिड करू नये. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. तुमचा तर्क अचूक ठरेल. अती चौकसपणा दाखवू नका.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. घरगुती वापरासाठी वस्तूची खरेदी कराल. ध्यान धारणे साठी वेळ द्यावा. आर्थिक व्यवहार जपून करावेत. कोर्ट-कचेरीची कामे निघतील.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
व्यवसाय वृद्धीकडे मार्गक्रमण करावे. मुलांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. आपल्याच मतावर आग्रही राहाल. धूर्तपणे वागणे ठेवाल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर