Gajkesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह काही काळानंतर बदलतो, ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो. अशा नऊ ग्रहांपैकी एक गुरू आहे. सध्या वृषभ राशीत गुरू ग्रह स्थित आहे; पण मे २०२५ मध्ये तो आपली राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश करील, जिथे तो वर्षभर राहणार आहे. अशा स्थितीत गुरूचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होईल. नवीन वर्षात मिथुन राशीत गुरूचा चंद्राशी संयोग होऊन ‘गजकेसरी योग’ निर्माण होईल. हा अतिशय शुभ योग मानला जातो. या योगाच्या निर्मितीने जीवनात अनेक प्रकारची सुखे प्राप्त होऊ शकतात. पण, मिथुन राशीमध्ये गजकेसरी योग बनल्याने कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊ…
तब्बल १२ वर्षांनंतर २०२५ या नवीन वर्षामध्ये २८ मे रोजी गजकेसरी योग तयार होणार आहे. द्रिक पंचांगनुसार, गुरू ग्रह १४ मे रोजी वृषभ राशीतून बाहेर पडून, मिथुन राशीत प्रवेश करील. २८ मे रोजी चंद्र वृषभ सोडेल आणि दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करील. जिथे चंद्र ३० मेपर्यंत राहणार आहे. अशा स्थितीत या राशीत गजकेसरी योग तयार होत आहे.
२०२५ च्या गजकेसरी राजयोगाने ‘या’ ३ राशींचे लोक जगतील राजासारखं आयुष्य
ो
मिथुन
गजकेसरी योगामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. या काळात या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणात अपेक्षित परिणाम साधता येऊ शकतात. तसेच, अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतत. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. तुम्ही विविध माध्यमांतून चांगले पैसे कमवू शकता. आरोग्य चांगले राहू शकते.
सिंह
गजकेसरी राजयोग सिंह राशीसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातील आव्हाने, संकटे दूर होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतात. मुलांची प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्रातही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची, तसेच वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता जास्त आहे. या योगामुळे अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.
तूळ
गजकेसरी राजयोग तूळ राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तूळ राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असू शकतो. त्यासह तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस संपून, तुम्ही यश मिळवू शकता. प्रत्येत कामात भावा-बहिणीचे सहकार्य मिळू शकेल. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात.
(टीप : सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)