वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करून शुभ आणि अशुभ योग तयार करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. सध्या तुम्हाला अशाच एका अशुभ योगाबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्या योगाचे नाव गुरु चांडाळ योग असं आहे. हा योग गुरु आणि राहूच्या संयोगाने तयार होतो. जो यावर्षी २३ एप्रिल २०२३ रविवारी तयार होणार आहे. कारण या दिवशी देवगुरू बृहस्पति मेष राशीत प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे या राशीत सावलीचा ग्रह राहू आधीच विराजमान आहे. त्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर या योगाचा प्रभाव दिसून येईल. पण यातील ३ राशी अशा आहेत ज्यांना काळजी घेणे आवश्यक आहे. त्या तीन राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मेष राशी –
मेष राशीच्या लोकांसाठी गुरु चांडाळ योग हानिकारक सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून लग्नात तयार होईल. ज्यामुळे यावेळी तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तसेच जोडीदारासोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे. शिवाय तुम्हाला आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवू शकतात. तसेच, कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. तसंचआर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन गुंतवणूक करणं थांबवू शकता.
हेही वाचा- शनी लोहाच्या पाउलांनी मार्गी होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? धनलाभ होताना ‘हा’ ठरू शकतो धोका
मिथुन राशी –
गुरु चांडाळ योग तुमच्यासाठी प्रतिकूल ठरू शकतो. त्यामुळे व्यवसायात गुंतवणूक करणे टाळावे. तसेच, व्यवसाय आणि राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ थोडासा कठीण असू शकतो. शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्येही या राशीतील लोकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूक करणं टाळा नका. शिवाय तुमच्या उत्पन्नातही घट होऊ शकते.
हेही वाचा- ४ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनिच्या राशीत बुध प्रवेश करताच मिळू शकतो अपार पैसा
कर्क राशी –
गुरु चांडाळ योगामुळे कर्क राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये अपयश येऊ शकतं. कारण हा योग तुमच्या राशीतून दहाव्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. शत्रूकडून त्रास होऊ शकतो. नोकरदारांचे कामाच्या ठिकाणी कनिष्ठ किंवा वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. शिवाय तुम्ही वाहन चावताना काळजी घ्यायला हवी कारण अपघातासारखे वाईट प्रसंग उद्भवू शकतात. या कालावधीत, व्यवसायातील कोणताही करार अंतिम टप्प्यात रद्द होण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)