Diwali 2023 Lucky Zodiacs: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. काही ग्रहांच्या गोचराने शुभ तर काहींच्या परिवर्तनाने अशुभ योग तयार होत असतात. यंदाच्या वर्षातील आगामी दिवाळीत म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२३ ला असाच एक अत्यंत शुभ राजयोग तयार होत आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार १२ नोव्हेंबरला गजकेसरी राजयोग तयार होत आहेत. हा राजयोग अत्यंत शुभ व दुर्मिळ मानला जातो त्यातही दिवाळीसारख्या शुभ मुहूर्तावर या राजयोगाची निर्मिती होणार असल्याने त्याचा प्रभाव द्विगुणित होऊ शकतो. दिवाळीत गुरु व चंद्र एकत्र येऊन गजकेसरी राजयोग साकारून काही राशींना धनलाभाचा मार्ग मोकळा करून देणार आहे. या राशींना दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड श्रीमंती अनुभवता येऊ शकते. या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..

दिवाळीच्या दिवशीच गजकेसरी राजयोग, ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

वृषभ राशीला दिवाळीला गजकेसरी राजयोग बनल्याने प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशींचे आर्थिक स्रोत आणखी बळकट होऊ शकतात. केवळ नोकरीच नव्हे तर अर्थाजन करण्याचे अन्य मार्ग सुद्धा तुमच्यासाठी मोकळे होऊ शकतात. दिवाळीच्या कालावधीत कुटुंबासह घालवलेल्या वेळेमुळे सुखी व समाधानी वाटू शकते. तुमचा बँक बॅलन्स बऱ्याच दिवसांनी स्थिरावू शकतो. आर्थिक फायद्यासाठी शेअर बाजार किंवा तत्सम गुंतवणुक फायदेशीर ठरू शकते.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

गजकेसरी राजयोग मिथुन राशीला लाभदायक ठरू शकतो. व्यवसाय व नोकरीच्या संधी तुमच्याकडे चालून येऊ शकतात. दिवाळीत तुम्हाला कामाचा तणाव सहन करावा लागू शकतो पण यातून मिळणारा धनलाभ हा तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पद- प्रतिष्ठा वाढल्याने स्वतःविषयी विश्वास वाटू लागेल. वैवाहिक आयुष्यात सुधारणा होण्याचे संकेत आहेत. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या मंडळींना लवकरच गोड बातमी मिळू शकते.

हे ही वाचा<< २९ जून २०२४ पर्यंत शनीचे १८० अंशात भ्रमण! ‘या’ राशीचे लोक साडेसातीचा प्रभाव कमी झाल्याने होणार कोट्याधीश?

धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)

धनु राशीला गजकेसरी राजयोग भौतिक सुखाची प्राप्ती करून देऊ शकतो. तुम्ही वाहन किंवा घर खरेदीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळू शकते. रिअल इस्टेट म्हणजेच प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीतून आपल्याला लाभाचे संकेत आहेत. या काळात कंपनीकडून चांगला बोनस मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुमची कोणतीही मोठी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. घरातील कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader