Hartalika 2023 Gajkesari Rajyog: गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधीचा दिवस म्हणजेच हरतालिका. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी या दिवशी उपवास व विधिवत व्रत केल्याने फायदा मिळतो अशी भाविकांची श्राद्ध आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला म्हणजेच आज १८ सप्टेंबर २०२३ ला हरतालिका व्रताचा मुहूर्त आहे. आज कित्येक वर्षांनी या खास दिवशी एक आणखीन खास योग जुळून आलेला आहे. हरतालिकेला यंदा सोमवार आला असून यादिवशी रवी योग, इंद्र योग, व गजकेसरी राजयोग तयार झाला आहे. बाप्पा आपल्या सर्व राशींच्या भक्तांना याचा शुभ लाभ मिळवून देणार असले तरी काही अशा राशी आहेत ज्यांच्या नशिबाला वेगळीच कलाटणी मिळू शकते.

हरतालिकेला कसा जुळून आलाय गजकेसरी राजयोग?

हरतालिकेच्या एक दिवस आधीच म्हणजेच काल १७ सप्टेंबरला रात्री ११ वाजून ८ मिनिटांनी चंद्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. गुरु मेष राशीत तर चंद्र तूळ राशीत आल्याने दोघेही १८० अंशात एकमेकांच्या समोर आले आहेत व त्यामुळे गजकेसरी राजयोग तयार झाला आहे. १८ सप्टेंबरपासून या राजयोगामुळे अनंत चतुर्दशीपर्यंत तीन राशींना बक्कळ धनलाभ होऊ शकतो. या राशी कोणत्या जाणून घेऊया ..

Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Triekadash Yogo 2025
२०२५मध्ये शनी-बुध निर्माण करेल त्रिएकादश योग! या राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, होणार धनलाभ
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख

गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळणार बाप्पाचे वरदान

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीच्या मंडळींसाठी हरतालिकेपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचा वेळ हा शुभ सिद्ध होऊ शकतो. या राशींच्या मंडळींना वाडवडिलांच्या संपत्तीतून मोठा धनलाभ होण्याचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी प्रशंसेसह बोनस स्वरूपात धनलाभ होऊ शकतो. ग्रहबळ मजबूत असल्याने आर्थिक स्थितीसह समाजातील मान- सन्मान वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तुम्हाला आपत्यांकडून एखादी शुभ वार्ता मिळू शकते.

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

हरतालिकेलाच आपल्या राशीला प्रचंड मोठा धनलाभ होण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात. भूतकाळात तुम्ही केलेली गुंतवणूक आता फळाला येणार आहे त्यामाध्यमातून तुमचे आर्थिक बळ वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या मैत्रिणीच्या रूपातून मित्र तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. बाप्पाच्या आगमनासह तुमच्या नशिबाचे दार उघडणार आहे. वैवाहिक जीवन उत्तम राहील.

हे ही वाचा<< १६ दिवसांनी बुधदेव व वैभवलक्ष्मी ‘या’ ३ राशींमध्ये भद्र राजयोग बनवणार! दसऱ्यापर्यंत सोन्यासारखे दिवस जगता येतील

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

हरतालिका आपल्या राशीसाठी सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. पदोन्नती, पगारवाढ, समाजातील प्रतिष्ठा या सगळ्यासह तुम्हाला सर्वात महत्त्वाची अशी मानसिक शांती लाभू शकते. तुम्हाला या कालावधीत आनंदी राहता येणार आहे. जुन्या आजारातून मुक्ती मिळू शकते, परिणामी तुम्हाला आरोग्यरुपी धनप्राप्ती होऊ शकते. मेहनतीला पर्याय नसेल पण तुम्हाला मेहनतीचे फळ मिळण्यासाठी नशिबाची साथ लाभू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader