Guru Gochar in Vrishabha Rashi:  ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होतं असतो. जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम दिसून येतात. त्याचा काही राशींवर चांगला परिणाम होतो. गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्त्व आहे. सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्त्वाचं स्थान आहे. गुरू हा सुख-शांति, संपत्ती, ऐश्वर्य, विवाह, धार्मिक कार्याचा कारक आहे. देवगुरूने १ मे २०२४ रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. देवगुरुने तब्बल १२ वर्षांनी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. गुरु २०२५ पर्यंत याच राशीत विराजमान राहतील. त्यामुळे काही राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. येणारे नऊ महिने काही राशींना जबरदस्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत; या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना मिळणार अपार धनलाभ?

वृषभ राशी (Taurus Zodiac)

देवगुरुच्या गोचरामुळे वृषभ राशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. गुरुच्या मार्गक्रमणामुळे तुमचं नशीब उघडण्याची शक्यता आहे. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. गुरु कृपेने तुम्ही पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात सुख-शांति नांदण्याची शक्यता आहे. यावेळी धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Surya gochar in Makar rashi
१४ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींनी राहावे सतर्क; करावा लागू शकतो आर्थिक समस्यांचा सामना
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख

(हे ही वाचा : गरिबीचे दिवस संपणार! १९ जुलैपासून बुधलक्ष्मी कृपेने ‘या’ राशींचे नशीब फळफळणार, मिळणार पैसा? तुम्हाला आहेत का धनलाभाचे योग? )

सिंह राशी (Leo Zodiac)

देवगुरुच्या राशी बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या राशीतील लोकांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. देव गुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे. विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

कन्या राशी (Virgo Zodiac)

देवगुरुच्या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीतील लोकांना प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. या काळात गुंतवणूक करणे देखील तुमच्यासाठी अनुकूल ठरु शकते. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader