Guru Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत उपस्थित असलेले ९ ग्रह माणसाच्या जीवनावर परिणाम करतात. ग्रहांच्या स्थितीचा परिणाम माणसाच्या प्रत्येक क्रियेवर होत असतो.  वैदिक ज्योतिषशास्त्रात, बृहस्पति म्हणजेच गुरू हा ईश्वराचा कारक मानला जातो. गुरु हा ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ ग्रह मानला जातो. जेव्हा हा ग्रह आपला मार्ग बदलतो, तेव्हा त्याचा सर्व १२ राशींवर परिणाम होतो. गुरु ग्रह जवळपास १३ महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. बृहस्पति सध्या मेष राशीत असून पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये देव गुरु वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. अशा परिस्थितीत येणारे नवीन वर्ष काही राशींसाठी शुभ परिणाम घेऊन येणारे ठरु शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन वर्षांत ‘या’ राशींचे अच्छे दिन?

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी येणारे नवीन वर्ष सुख, समृध्दी घेऊन येणारे ठरु शकते. नवीन वर्षात या राशीतील मंडळींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात आरोग्यविषयक समस्या दूर होऊ शकतात. तसेच करिअरमध्ये प्रगती होताना दिसून येऊ शकते. कर्जाचा बोजाही हलका होऊन कौटुंबिक वातावरण आनंदी राहण्याची शक्यता दिसत आहे.

(हे ही वाचा : पुढील महिन्यापासून कन्यासह ‘या’ चार राशींना होणार अपार धनलाभ? शुक्र आणि शनिदेवाच्या कृपेने घरात येऊ शकते धनलक्ष्मी )

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी २०२४ हे वर्ष फायदेशीर ठरु शकते. या नव्या वर्षात या राशीतील मंडळींना चांगल्या बातम्या मिळू शकतात. या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच नोकरीत बढतीची शक्यता निर्माण होईल. जे बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसायात सुरू असलेले अडथळे दूर होऊन धनलाभ होऊ शकतो.

कन्या राशी

देव गुरुचे गोचर कन्या राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळू शकतो. तर जे नोकरीच्या शोधात होते त्यांना नोकरी मिळू शकते. अविवाहित लोकांचा विवाह निश्चित केला जाऊ शकतो. नवीन वर्षात या राशीतील मंडळी नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकतात. या दरम्यान राजकारणाशी संबंधित लोकांना काही पद मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)