Guru Gochar 2024 : नऊ ग्रहाचे वेगवेगळे आणि विशेष महत्त्व आहे पण काही ग्रह असे असतात की ज्यांचा जीवनावर प्रभाव असतो. काही ग्रहांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यात गुरू ग्रहाचासुद्धा समावेश आहे. देवांचे गुरू असलेला गुरू ग्रह नशीब, धन संपत्ती, विवाह आणि धर्माचा कारक मानला जातो. त्यामुळे गुरू ग्रहाला शुभ ग्रह मानले जाते. कुंडलीत गुरू ग्रह असणे म्हणजे व्यक्ती नशीबवान, धनवान, आणि ज्ञानी आहे, असे मानतात. गुरू ग्रह वर्षातून एका राशीमध्ये प्रवेश करतो, २०२४ मध्ये गुरू वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे.बारा वर्षांनंतर गुरू ग्रह वृषभ राशीमध्ये गोचर करणार आहे आणि याचा फायदा इतर राशींना होईल.त्या राशी कोणत्या, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
१ मे गुरू ग्रह गोचर करणार आहे. १ मे रोजी राशी परिवर्तन करत वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. असा योग १२ वर्षानंतर येत आहे. त्यामुळे गुरू ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असल्याची घटना खूप मोठी मानली जाते. कोणत्या राशींना हे गोचर फायदेशीर ठरेल जाणून घ्या.
मेष
सध्या गुरू मेष राशीमध्ये विराजमान आहे आणि आता वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरूचे राशी परिवर्तन काही लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांना कामात यश मिळेल. धनलाभाची संधी मिळू शकते याचबरोबर या लोकांना शुभ वार्ता मिळू शकते.
हेही वाचा : एप्रिलमध्ये ‘या’ राशींचे नशीब पालटणार? १ वर्षांनी ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ बनल्याने मिळू शकतो बक्कळ पैसा
वृषभ
गुरू हा वृषभ राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे या राशीला याचा चांगला फायदा दिसून येईल. वृषभ राशीच्या लोकांच्या अनेक सकारात्मक बदल दिसून येईल. करिअरमध्ये मनाप्रमाणे प्रगती होईल. कमाईचे नवीन स्त्रोत तयार होईल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते आणि मान सन्मान वाढेल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना गुरूचे राशी परिवर्तन फायद्याचे ठरू शकते. या लोकांना कामात यश मिळेल. कर्क राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. अडचणी दूर होतील. सुख समृद्धी लाभेल. पगार वाढ होऊ शकते. कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. कुटूंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकेल. या लोकांना वैवाहिक सुख मिळेल
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)