वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रह हालचाल करतात त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. बृहस्पति हा देवांचा गुरू आहे, जो लोकांना शुभ फल देतो. गुरूचे संक्रमण लोकांना सकारात्मक परिणाम देते. देव गुरु बृहस्पति हे स्वत:च्या म्हणजे मेष राशीत विराजमान आहेत. देव गुरु १ मे २०२४ पर्यंत मेष राशीत राहणार आहेत. यानंतर ते वृषभ राशीत गोचर करणार आहेत. त्यामुळे काही राशींना सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. अनाचक अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींवर बरसणार पैशांचा पाऊस?
मेष राशी
देव गुरुचे राशी परिवर्तन मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी करिअरमध्ये यश मिळू शकते. तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. परदेश दौऱ्याचे नियोजन तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकते. तब्येतीत सुधारणार होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास आणि धैर्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : ५०० वर्षांनी २ राजयोग! मार्चपासून करोडोमध्ये खेळतील फक्त ‘या’ राशीचे लोकं? शुक्र-शनिच्या कृपेने मिळू शकतो अमाप पैसा )
कर्क राशी
देव गुरुच्या राशी परिवर्तनाने कर्क राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात योग्य गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांचे अडकलेले पैसे यावेळी परत मिळू शकतात. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. कुटुंबाच्या परिस्थितीवरही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या काळात, तुम्हाला सरकारकडून लाभ आणि बक्षिसे मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी देव गुरुचे राशी परिवर्तन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरु शकते. नोकरीत सुरु असलेल्या अडचणी याकाळात दूर होऊ शकतात. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुठूनतरी रखडलेले पैसे परत मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक बदल दिसून येऊ शकतात. यावेळी तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू खरेदी करु शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)