Guru Gochar 2024 in Vrishabha Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थिती बदलाला खूप महत्त्व आहे. ग्रह किंवा नक्षत्र जेव्हा आपलं स्थान बदलतं तेव्हा याचा परिणाम १२ राशींच्या आयुष्यावर दिसून येतो. ग्रहांचं हे गोचर काही राशींसाठी सकारात्मक ठरतं तर काही राशींच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम दिसून येतो. बृहस्पति म्हणजे देव गुरु २०२३ च्या अखेरीस मेष राशीत मार्गी झाले आहेत. तर १ मे ला देवगुरु वृषभ राशीत मार्गक्रमण करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्त्व आहे. सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्त्वाचं स्थान आहे. गुरू हा सुख-शांति, संपत्ती, ऐश्वर्य, विवाह, धार्मिक कार्याचा कारक आहे. बारा वर्षांनी देवगुरु वृषभ राशीत प्रवेश करताच काही राशींना शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. त्यांना जीवनात सुख समृध्दी आणि अपार धन लाभण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात गुरुच्या या मार्गक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

‘या’ राशींचे सुखाचे दिवस?

वृषभ राशी

या राशीच्या लग्न भावात देवगुरु गोचर करणार आहेत. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. गुरुच्या मार्गक्रमणामुळे तुमचं नशीब उघडण्याची शक्यता आहे. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. गुरु कृपेने तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांति नांदण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : मकर संक्रांतीपासून ‘या’ राशींचे शुभ दिवस होतील सुरु? सूर्यदेव शनिदेवाच्या लाडक्या राशीत गोचर करताच बदलू शकते भाग्य )

सिंह राशी

या राशीत गुरु पंचम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे आणि सिंह राशीमध्ये दहाव्या भावात राहील. अशा स्थितीत या राशीतील लोकांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. देव गुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

या राशीत देवगुरु नवव्या भावात राहणार आहेत. अशा स्थितीत या राशीतील लोकांना प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. या काळात गुंतवणूक करणे देखील तुमच्यासाठी अनुकूल ठरु शकते. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)