Guru Gochar 2025 : गुरू हा नवग्रहामध्ये खूप खास मानला जातो. गुरू जवळपास एक वर्षानंतर राशी परिवर्तन करतो पण २०२५ मध्ये गुरू तीन पट वेगाने चालणार आहे ज्याला गुरू अतिचारी म्हणतात. त्यामुळे यंदा गुरू तीन वेळा राशी परिवर्तन करणार.
प्रत्येक राशीच्या लोकांच्या आयुष्यावर याचा परिणाम दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू पहिल्यांदा १४ मे २०२५ ला मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर १४ मे २०२५ ला मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर १८ ऑक्टोबर २०२५ ला गुरू उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करणार आहे. वर्षाच्या शेवटी ५ डिसेंबरला गुरू पुन्हा मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

गुरूच्या गोचरचा थेट परिणाम राशिचक्रातील इतर राशींवर दिसून येईल. याचा सर्वात जास्त परिणाम तीन राशींवर दिसून येईल. जाणून घेऊ या, गुरूच्या गोचरचा कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

Mangal rashi parivrtan 2024
येणारे ९२ दिवस पडणार पैशांचा पाऊस; ‘या’ तीन राशींवर मंगळ करणार कृपा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
Budh ast 2025
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा; अस्त बुध करणार मालामाल
shukra gochar 2025 | venus transit in meen
Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा

मेष राशी (Mesh Zodiac)

गुरू या राशीच्या नवव्या स्थानावर विराजमान आहे. देवगुरू मार्गी झाल्याने त्यांची गति हळू हळू वाढणार. मिथुन राशीमध्ये येताच गुरू तिसऱ्या स्थानावर राहणार. तसेच गुरू नवव्या, बाराव्या, एकादश आणि सातव्या स्थानाचे फळ खूप लवकर प्रदान करणार. त्यानंतर ते हळूवार कर्क राशीमध्ये प्रवेश करणार. या राशीच्या लोकांना अपार धनलाभ प्राप्त होऊ शकतो.

घरात एखाद्या सदस्याचा विवाह होईल किंवा संतान प्राप्ती होईल. जर या लोकांना कर्ज घ्यायचे असेल तर त्यांना यश मिळू शकते. गुरुची दृष्टी आठव्या स्थानी पडल्यामुळे पितृ संपत्ती किंवा कोणालाही दिलेला पैसा परत मिळू शकतो. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. अतिचारी गुरू असल्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. हे लोक परदेशातून सुद्धा लाभ मिळू शकतात.

धनु राशी (Dhanu Zodiac)

गुरू या राशीचा स्वामी ग्रह आहे. तसेच चतुर्थ स्थानाचा स्वामी आहे. गुरू राशी परिवर्तन करून सप्तम स्थानावर येणार आहे. अशात या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. जमीन, घर, खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. तसेच नोकरी आणि व्यवसायात लाभ मिळू शकतो.
गुरू एकादश, प्रथम आणि तृतीय स्थानावर दिसून येईल ज्यामुळे या लोकांना अनेकदा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. या प्रवासाचा यांना लाभ सुद्धा होणार. या लोकांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. जेव्हा ऑक्टोबर मध्ये गुरू कर्क राशीमध्ये प्रवेश करणार, तेव्हा ते आठव्या स्थानावर राहणार आहे. त्यामुळे या लोकांना शुभ बातमी मिळू शकते.तसेच अध्यात्माकडे हे लोक वळतील. पण आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

कुंभ राशी (Kumbha Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरूचे मिथुन आणि कर्क राशीमध्ये प्रवेश करणे लाभदायक ठरू शकते. गुरू मिथुन राशीमध्ये प्रवेश करून या राशीचे लोक पाचव्या स्थानी राहणार आहे. अशात या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. तसेच नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. याशिवाय पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत दिसतील.

जर या राशीचे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर काळ त्यांच्यासाठी उत्तम आहे. पाचव्या स्थानी राहून गुरू नवव्या , एकादश आणि पहिल्या भावमध्ये विराजमान राहणार आहे. अशात हे लोक अध्यात्माकडे वळतील. ऑक्टोबरमध्ये गुरू कर्क राशीमध्ये प्रवेश करून या राशीच्या सहाव्या स्थानी विराजमान राहणार आहे. अशात आरोग्याविषयी समस्या निर्माण होऊ शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader