Guru Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह सुमारे १३ महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करतो. गुरुला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी १२ वर्षे लागतात. यात गुरु सध्या वृषभ राशीत भ्रमण करत आहे, पण मे महिन्यात मिथुन राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे काही राशींसाठी सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. तसेच या राशींना पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. नेमकं कोणत्या राशींना गुरु गोचरचा फायदा होऊ शकतो जाणून घेऊ…

शुक्राचा मिथुन राशीतील प्रवेश ‘या’ तीन राशीच्या लोकांना करेल श्रीमंत!

मिथुन

गुरु गोचर मिथुन राशीसाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येईल. तसेच सर्व प्रलंबित कामे आता पूर्ण करता येतील. नोकरी करणाऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकते. या वेळी अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात, तसेच या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात लाभ मिळू शकतो.

तुळ

गुरु ग्रहाचा राशी बदल तुळ राशीसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमचे भाग्य बदलू शकते. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायानिमित्त प्रवासाची संधी मिळेल. यातून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक उत्तम संधी मिळवता येऊ शकतात. या काळात व्यापार वर्गातील लोक त्यांचा व्यवसाय वाढवू शकतात. अनेकांना कामात येणारे सर्व अडथळे दूर करता येतील. या काळात धार्मिक कार्यात तुमची आवड वाढू शकते. तुम्ही धार्मिक कार्यांवरही पैसे खर्च करू शकता.

वृषभ

गुरु ग्रहाचा मिथुन राशीतील बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला अनेक नव्या स्त्रोतांमधून मोठा आर्थिक लाभ मिळवता येऊ शकतो. हा काळ व्यापार वर्गातील लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. दरम्यान नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यातील अडथळे आता दूर होऊ शकतात. तसेच हा काळ प्रेमात पडलेल्या लोकांसाठी खूप शुभ राहील. नात्यांमध्ये भावनिक संपर्क अधिक मजबूत होईल.