Jupiter Planet Transit in Mithun: ज्योतिष्यशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात. सुख, संपत्ती, वैभव, ऐषोराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरुचा राशी बदल अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो. गुरु ग्रह सुमारे १३ महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो, त्यामुळे एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला १२ वर्षे लागतात. वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार, गुरु ग्रह १४ मे २०२५ रोजी मे महिन्यात मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. गुरु ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या…
‘या’ राशींच्या लोकांना येणार सोन्याचे दिवस?
मिथुन
गुरु ग्रहाचे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या सुखसोयी आणि ऐषोरामात झपाट्याने वाढ होऊ शकते. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. नशिबाच्या साथीमुळे तुम्हाला व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळू शकेल. एवढंच काय तर नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे. आर्थिक लाभाचीही पूर्ण शक्यता आहे. यासोबतच तुम्ही संपत्ती वाढवण्यातही यशस्वी होऊ शकता. तुमचं लव्ह लाईफ चांगलं असणार आहे. जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
सिंह
गुरु ग्रहाच्या गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. खिसा सतत पैशाने भरलेला राहू शकतो. एवढंच काय तर या राशीच्या लोकांचा अडकलेला पैसाही परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. व्यवसाय करणारे नफ्यात राहू शकतात. धनलाभ होऊ शकतो. थांबलेली कामे मार्गी लागू शकतात. व्यापारी वर्गातील लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. तसेच या काळात तुमचे रखडलेले पैसेदेखील तुम्हाला मिळू शकतात.
कुंभ
गुरु ग्रहाच्या गोचरमुळे कुंभ राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. या काळात तुमचे रखडलेले पैसेदेखील तुम्हाला मिळू शकतात. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा फार चांगली असू शकते. मित्रांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळू शकतो. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. तसेच नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे, लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)