Jupiter Transit 2024: देवांचा गुरु अर्थात गुरु ग्रह हा नवग्रहांमध्ये सर्वात विशेष ग्रह मानला जातो, कारण देवांचा गुरु असण्यासह तो धन-वैभव, सुख-समृद्धीचा कारकही मानला जातो. धनदौलत, शिक्षण, मानसन्मान, शिक्षणाचा कारक मानला जातो. गुरु ग्रह एका राशीत सुमारे एक महिना राहतो. अशा स्थितीत पुन्हा एका राशीत येण्यासाठी १२ वर्षांचा अवधी लागतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु सध्या वृषभ राशीमध्ये स्थित आहे. यानंतर मे २०२५ मध्ये राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश करेल. पण, गुरु ग्रह २०२५ मध्ये एकदा नाही तर दोनदा राशी बदलणार आहे. अशा स्थितीत २०२५ मध्ये अनेक राशींना लाभ मिळतील, तर काही राशींना थोडी काळजी घेण्याची गरज भासू शकते. २०२५ मध्ये गुरु ग्रह नेमका केव्हा राशी बदल करणार आहे आणि याचा कोणत्या तीन राशींच्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव पडणार आहे, ते जाणून घेऊया…

ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ या वर्षात देवगुरु गुरु १५ मे रोजी वृषभ राशीतून निघून पहाटे २.३० वाजता मिथुन राशीत प्रवेश करेल. यानंतर १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५७ वाजता, गुरु मिथुन राशीतून बाहेर पडेल आणि कर्क राशीत प्रवेश करेल. यानंतर तो ४ डिसेंबर रोजी रात्री ८.३९ वाजता पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करेल.

Guru planet transit 2025
नुसता पैसाच पैसा! २०२५ मध्ये गुरू करणार तीन वेळा राशीपरिवर्तन; ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्तीचे सुख
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
3rd November 2024 Rashi Bhavishya
भाऊबीज, ३ नोव्हेंबर पंचांग: अनुराधा नक्षत्रात १२ राशींचा रविवार जाणार आनंदात, जोडीदाराचा सहवास ते आर्थिक भरभराट होणार
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Narak Chaturdashi 2024
Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीपासून ‘या’ पाच राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार पैसा अन् धनसंपत्ती
Money position and happiness will come Jupiter's entry into Gemini in 2025
पैसा, पद अन् सुख-समृद्धी येणार; २०२५ मध्ये गुरूच्या मिथुन राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशींचा होणार भाग्योदय
Guru Gochar 2025
देवगुरु घर सोडताच ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी? देवगुरु २०२५ मध्ये दोनदा गोचर करत देऊ शकतात अपार पैसा

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुचे राशी परिवर्तन खूप फायदेशीर ठरू शकते. या काळात नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. तुमच्या मुलांकडूनही तुम्हाला चांगली बातमी मिळू शकेल. या राशीत गुरुचे आगमन मूल होण्याची इच्छा असलेल्या जोडप्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रातही खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला हवे ते शिक्षण घेऊ शकता. त्यामुळे करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. पदोन्नतीद्वारे तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. व्यवसायातही भरपूर फायदा होऊ शकतो. समाजात मानसन्मान वाढू शकतो. याबरोबरच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. या राशीच्या लोकांना भौतिक सुखाबरोबर प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

सिंह

गुरुच्या राशी बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना चांगले दिवस येऊ शकतात. आर्थिक लाभाचे मार्ग खुले होऊ शकतात. यामुळे पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही खूप यशस्वी व्हाल. यासोबतच अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर भावा-बहिणींशी संबंध चांगले राहतील. अशा परिस्थितीत लग्नाचे अनेक प्रस्ताव येऊ शकतात. लव्ह लाईफदेखील चांगली राहील. ऑक्टोबरमध्ये कर्क राशीत आल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे थोडे सावध राहा.

तुळ

गुरुचा राशी बदल तुळ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात तुळ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. याचबरोबर तुमचा अध्यात्माकडे अधिक कल वाढू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल. तुमच्या कष्टानुसार तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल. काहींची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. मुलांकडूनही आनंद मिळू शकेल. यामुळे आत्मविश्वास वाढू शकतो, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता.

Story img Loader