Guru Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये देवांचा गुरु गुरु हा एक अतिशय खास आणि सर्वात महत्वाचा ग्रह मानला जातो. गुरु ग्रह एका वर्षात एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी परिवर्तन करतो. अशाप्रकारे संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी गुरुला सुमारे १२ वर्षांचा कालावधी लागतो. २०२५ मध्ये गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल आणि वर्षभर या राशीत राहील. विशेष म्हणजे जुलैमध्ये राक्षसांचा स्वामी शुक्रही मिथुन राशीत येणार आहे, ज्यामुळे शुक्र आणि गुरुच्या संयोगाने गजलक्ष्मी योग तयार होईल. अशा स्थितीत हा योग मिथुन, सिंह आणि तूळ या तीन राशींसाठी अतिशय शुभ राहील. २०२५ हे वर्ष या तीन राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया की २०२५ मध्ये गुरु आणि शुक्र यांच्या संयोगामुळे निर्माण झालेला गजलक्ष्मी योगाचा कसा फायदा होईल.

गजलक्ष्मी योगाने ‘या’ तीन राशी होणार मालामाल, प्रत्येक मिळेल कामात यश

मिथुन

गजलक्ष्मी योग मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येईल. या काळात मिथुन राशीच्या लोकांना गुरु आणि शुक्राचा विशेष आशीर्वाद मिळेल. मुलांच्या शिक्षण, करियरबाबत असलेली काळजी कमी होईल. तुम्हाला एखादी चांगली बातमीदेखील मिळू शकते. लग्नासाठी स्थळ पाहणाऱ्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकेल. विवाहित लोकांचे जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. समाजात मान-सन्मान वाढू शकेल. कमाईचे नवीन मार्ग उघडू शकतात. २०२५ मध्ये आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. तुम्ही भविष्यासाठी बचतदेखील करू शकाल. व्यवसाय करणाऱ्यांनाही फायदा होऊ शकतो.

Horoscope 2025 Malavya rajyog in meen shukra gochar
Malavya Rajyog 2025 : नवीन वर्षात ‘या’ राशींची होणार आर्थिक भरभराट! मालव्य राजयोगामुळे बनाल अमाप संपत्तीचे मालक अन् घराचे स्वप्न होईल पूर्ण
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Mangal Vakri Gochar 2024 Mars Retrograde 2024 Horoscope
Mangal Vakri 2024 : ७ डिसेंबरपासून ‘या’ पाच राशींच्या आयुष्यात उलथापालथ; मंगळाच्या उलट्या चालीमुळे धनहानी अन् कामात अडचणी
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
mercury transit in scorpio 2024
बुध ग्रहाची उलटी चाल, २६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना करेल श्रीमंत! नोकरी व्यवसायात मिळेल यश अन् बक्कळ पैसा
actress Shobitha Shivanna suicide
अभिनेत्री शोभिता आढळली मृतावस्थेत, राहत्या घरी संपवलं आयुष्य

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु शुक्राच्या संयोगाने तयार होणारा गजलक्ष्मी योग शुभ मानला जातो. तुमची प्रलंबित कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळू शकेल. अभ्यासातही यश मिळेल, अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात काही चांगली बातमी कानावर येईल. भावा-बहिणींशी संबंध चांगले राहतील. व्यवसायात प्रगती साधता येऊ शकेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्येही नवीन उंची गाठू शकता. अशाने उत्पन्न वाढू शकेल.

हेही वाचा – Malavya Rajyog 2025 : नवीन वर्षात ‘या’ राशींची होणार आर्थिक भरभराट! मालव्य राजयोगामुळे बनाल अमाप संपत्तीचे मालक अन् घराचे स्वप्न होईल पूर्ण

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी योग फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना याचा खूप फायदा होऊ शकतो. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते किंवा मुलांकडून आनंद मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळू शकते. उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन मिळू शकेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे.

(टीप – सदर लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)