Jupiter Planet Transit 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये गुरूला धन संपत्ती, सुख समृद्धी, मान सन्मानाचा कारक मानला जातो. गुरु जवळपास १३ महिन्यानंतर गोचर करतात. गुरू ग्रह आता वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि मे महिन्यात त्यानंतर मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार ज्यावर ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचे वर्चस्व आहे. अशात काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच त्यांची धन संपत्ती वाढू शकते. जाणून घेऊ या त्या कोणत्या राशी आहेत.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
गुरूचा गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. कारण गुरू या राशीच्या लग्नभावामध्ये विराजमान आहे. त्यामुळे या लोकांच्या आत्मविश्वासामध्ये वृद्धी होईल. तसेच अडकलेले कार्य मार्गी लागू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना लाभ योग निर्माण होत आहे. तसेच या वेळी नोकरी शोधणाऱ्या लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखमय होणार. तसेच जोडीदाराची प्रगती होऊ शकते. या दरम्यान अविवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. समाजात या लोकांची प्रतिष्ठा वाढेन. लोक यांच्याकडे आकर्षित होतील.
हेही वाचा : Makar Sankranti Astrology 2025 : मकर संक्रांतीच्या दिवशी चार राशींचे नशीब चमकणार, मिळणार पैसाच पैसा!
वृषभ राशी (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाचे राशी परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. कारण गुरू ग्रह आपल्या राशीच्या धन आणि वाणी स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना वेळोवेळी आकस्मिक धन लाभ होऊ शकतो. या दरम्यान या लोकांच्या बोलीभाषांमध्ये बदल दिसून येईल ज्यामुळे हे लोक कोणालाही इंप्रेस करू शकणार. या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. अडकलेले धन परत मिळू शकते. जर तुमचे काम विदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला यश मिळू शकतो.
तुळ राशी (Tula Zodiac)
गुरू ग्रहाचा गोचर तुळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण गुरू या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये नवव्या स्थानावर प्रवेश करणार. त्यामुळे या वेळी तुळ राशीचे नशीब बदलू शकते. हे लोक देश विदेशात प्रवास करू शकतात. या लोकांना करिअरमध्ये अनेक संधी मिळू शकतात. या लोकांना या वेळी आपल्या प्रोफेशनल जीवनात मोठे सकारात्मक बदल मिळू शकतात. या वेळी या राशीचे लोक करिअरमध्ये मोठे यश प्राप्त करू शकतात. यांना नवीन जबाबदारी मिळू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)