Guru Gochar 2024 in Vrishabha Rashi: ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात. सुख, संपत्ती, वैभव, ऐषाराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरूचा राशी बदल अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो. आता शुक्रदेवाच्या वृषभ राशीत गुरुदेवाने गोचर केलं आहे. जे २०२५ पर्यंत याच राशीत विराजमान राहणार आहेत. त्यामुळे गुरुदेवाच्या कृपेने येणारे २११ दिवस काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या…
देवगुरुच्या कृपेने ‘या’ राशींचं नशीब उजळणार?
वृषभ राशी
देवगुरुच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. गुरुच्या मार्गक्रमणामुळे तुमचं नशीब उघडण्याची शक्यता आहे. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. गुरु कृपेने तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही देश-विदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता. व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबात सुख-शांति नांदण्याची शक्यता आहे.
सिंह राशी
देवगुरुच्या कृपेने सिंह राशीतील लोकांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. देव गुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो. अचानक झालेल्या धनलाभामुळे तुमचं बँक बॅलेन्समध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे. समाजात मान-प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते.
कन्या राशी
देवगुरुच्या कृपेने कन्या राशीतील लोकांना प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. या काळात गुंतवणूक करणे देखील तुमच्यासाठी अनुकूल ठरु शकते. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)