-उदयराज साने

BJP 2024 Astrology Prediction: भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिवस ६ एप्रिल रोजी नुकताच साजरा झाला. लोकशाही राष्ट्रांमध्ये आत्ताच्या राजकारणातील सर्वात क्रियाशील पक्ष असा लौकिक या पक्षाने मिळविला आहे. भारतात अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात याच पक्षाने करून दाखवली आहे. या पक्षाचा आगामी कालखंड कसा राहील याची उत्सुकता सर्वच जनतेला असल्याने, आपण फलज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन यांच्या आगामी कालखंडासाठी भाष्य करणार आहोत. दिनांक २१ एप्रिलच्या उत्तर रात्री बदलणारा गुरू हा बीजेपीसाठी मिथुन लग्नाच्या लाभस्थानात येत असल्याने, भाजपला या गुरूची संमिश्र फळे मिळणार आहेत.

आर्थिक आणि धार्मिक अस्वस्थता

मेष राशीत प्रवेश करणारा गुरू हा २१ मे ते १७ जून २०२३ पर्यंत राहूच्या युतीत राहणार असल्याने, हा गुरु-राहू असा चांडाळ योग होत आहे. हा योग पक्षासाठी संमिश्र फळ देईल.त्यानंतर २०२४ ला १ एप्रिल २०२४ ते ३० एप्रिल २०२४ ला गुरू-हर्षल युती योग होत आहे व याचा तीव्र टप्पा दिनांक १७ एप्रिल २०२४ ला गुरू-हर्षल युती योग कृतिका या राक्षसगणी नक्षत्रात होत आहे. याची फळे देशाला खूपच व्यापक स्वरूपातमिळणार आहेत. शिक्षण क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात खूप मोठ्या घडामोडी या कालखंडात घडून येणार आहेत. आर्थिक आणि धार्मिक अस्वस्थता या कालखंडात शिगेला पोहोचली असल्याचे दिसून येईल. याच कालखंडात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते.

Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
Mars Transit 2025 In Gemini
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात निर्माण होणार अडचणी; मंगळाच्या वक्री चालीने उद्भवणार आर्थिक समस्या
Makar Sankranti 2025 Puja Time and Significance in Marathi
Makar Sankranti 2025: १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार मकर संक्रांत; जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व
Libra Yearly Horoscope 2025 in Marathi| Tula Rashi Bhavishya 2025 in Marathi
Libra 2025 Rashi Bhavishya: २०२५ मध्ये लग्न जुळतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल… तूळ राशीला संपूर्ण वर्ष कसे जाईल? वाचा ज्योतिषतज्ज्ञ काय सांगतात
Shani Surya Yuti 2025
Shani Surya Yuti 2025 : यंदा दोनदा होणार सूर्य-शनिची युती, ‘या’ तीन राशींच्या वाढतील अडचणी

मुस्लीम समाज देशासाठी चांगला…

एप्रिल-मे २०२४ असे निवडणुकीचे महत्त्वाचे हे दोन महिने असल्याने, गुरू-हर्षल पक्षाला अत्यंत उपयुक्त असले तरी संमिश्र फळ देणारे आहेत. या अगोदर होणारा गुरू-राहू युती योग राष्ट्रप्रेमी जनतेसाठी सकारात्मक ऊर्जा देणार असून, मुस्लीम समाज देशासाठी चांगला विचार व योगदान देऊ शकतो. या समाजाला तसे करण्यास भाग पाडण्यासाठी पक्षाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. भाजपाच्या मूळ कुंडलीतील चंद्राला हा मेष-गुरू सहावा राहणार असल्याने, हा गुरू संमिश्र फळ देईल. शनीचे सध्या सुरू असलेले कुंभ राशीतील भ्रमण पक्षात अनेक स्वरूपाचे नवे बदल घडविण्यास भाग पाडणार आहे. कोणाच्याही कष्टाला किंमत मिळवून देण्याचे काम हा गोचर शनी करणार आहे. शततारका नक्षत्रातून भ्रमण करणाऱा शनी मकर व कुंभ नवमांशातून जाणार असल्याने, कष्टकरी जनतेला निश्चितपणे न्याय मिळवून देणार आहे.

मे २०२४ च्या शेवटास शनी हा गुरूच्या नवमांशात प्रवेश करणार आहे व प्रखर अशा ज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल. मेष राशीतील राहूने पक्षासाठी खूप चांगली मदत केली आहे. हा राहू पक्षाला २८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण साथ देणार आहे. त्यानंतर राहू मीन राशीत प्रवेश करेल. भाजपा च्या मिथुन लग्नाच्या कुंडलीत, हा गोचर राहू दशमात येत असल्याने, या राहूला अत्यंत महत्त्व द्यावे लागेल. या राहूचे भ्रमण रेवती नक्षत्रातून सुरू राहणार आहे. रेवती नक्षत्राचा अधिपती ग्रह बुध याचे गोचर भ्रमण सप्तमातून सुरू झालेले असेल. हा गोचर बुध २७ नोव्हेंबरला धनू राशीत प्रवेश करतो. भाजपासाठी लग्नेश बुधाचे भ्रमण अनुकूल ठरणार आहे. मीन राशीतील राहू हा पक्षासाठी संमिश्र असणार आहे. ह्याचे कारण भाजपाच्या मूळ कुंडलीतील रवीवरून ह्या राहूचे भ्रमण होणार असल्याने भाजपासाठी नवे मंथन, हा गोचर राहू निश्चितपणे करायला लावेल.

जगाला शांतता महत्त्वाची की निरंकुश सत्ता…

२०२४ च्या निवडणुका देशापुढे एक नवे लक्ष्य ठेवणार आहेत. गोचर राहू हा नवे लक्ष्य निश्चित करायला लावेल किंबहुना असे म्हणावे लागेल की, ‘जगाला शांतता महत्त्वाची की निरंकुश सत्ता महत्त्वाची’ हे ठरवावे लागेल. भाजपाला नवी ध्येयधोरणे व भारताच्या प्रमुख समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. मीन राशीतील राहू हे सर्व मंथन घडवणार आहे. मकर राशीतील प्लूटो, भाजपाच्या कुंडलीत अष्टमातून जात असून, उत्तराषाढा या रवीच्या नक्षत्रातून जात असल्याने, निरंकुश सत्ताच हवी याच विचाराने जग पुढे जात असल्याचे दिसल्याने भारताच्या संपूर्ण सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागणार आहे. यासाठी पक्षाच्या ध्येयधोरणात रचनात्मक बदल करावे लागणार आहेत.

तिकीटवाटपात मोठा गोंधळ

या वर्षातील भारतात दिसणार नसलेल्या ग्रहणांचा विचार करता दिनांक २० एप्रिलची ग्रहण अमावास्या पक्षाला अनुकूल आहे. दिनांक ५ मेचे चंद्रग्रहण पक्षाला थोडे कठीण फळ देणारे आहे. त्यानंतर पाचच दिवसांनी कर्नाटकातील मतदान असल्याने त्यावर या ग्रहण पौर्णिमेचा परिणाम होईल. यानंतर पुन्हा दिनांक १४ ऑक्टोबर २३ ला सूर्यग्रहण आहे. ही ग्रहण अमावास्या भाजपातील मोठ्या राजकीय व सत्तेवर असलेल्या व्यक्तींना अत्यंत तापदायक ठरणार आहे. यानंतर दिनांक २४ मार्च २०२४ ची ग्रहण पौर्णिमा पक्षाला निवडणुकीच्या रणधुमाळीत तिकीटवाटपात मोठा गोंधळ व असंतोष पसरवणारी आहे. ठिकठिकाणी बंडखोरी करण्याच्या तयारीत असंतुष्ट लोक असतील. पक्षात इतर पक्षातील मान्यवरांना काही आश्वासने पक्षप्रमुखांनी दिलेली आहेत, त्याचा फटका कष्टाळू कार्यकर्त्यांना बसणार असल्याने, अनेक लोक बंड करण्याची भाषा उघडपणे करणार आहेत.

भाजपाला घरचा विरोध …

पक्षातील अंतर्गत विरोध शमवणे अशक्य होणार असल्याने, मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता दिसून येते. ही ग्रहण पौर्णिमा पक्षाच्या दशमातून होत असल्याने त्याला महत्त्व द्यावेच लागणार आहे. नैसर्गिक आपत्तीचा मोठा धोका असल्याने कदाचित निवडणुकासुद्धा पुढे ढकलण्याची वेळ येऊ शकते. दिनांक ८ एप्रिल २०२४ चच्या ग्रहण अमावास्येच्या दुसऱ्याच दिवशी चंद्र-बुध युती होत असल्याने, आर्थिक स्तरावरील मोठे निर्णय लगेचच घेण्याची वेळ सरकारवर येऊ शकते. या पेचप्रसंगातून कसा मार्ग काढायचा, ही खरी कसोटी सरकारची असणार आहे.

जर मे २०२४ नंतर लोकसभा निवडणूक झाली तर…

दिनांक १ मे विषयी २०२४ ला गुरू वृषभ राशीत येतो. २०२४ च्या निवडणुका एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होऊ शकतात. १ मे २०२४ च्या नंतर होणाऱ्या निवडणुकात भाजपाला संपूर्ण यश मिळू शकते, कारण भाजपाच्या मूळ कुंडलीतील चंद्राच्या सप्तमातून गोचर गुरूचे भ्रमण होणार आहे. मात्र एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. पक्षाच्या दृष्टीने उमेदवार निवडीचे जसे प्रश्न आहेत, त्याप्रमाणेच भारताची वाढती लोकसंख्या, बेरोजगारी व काश्मिरी जनतेला पूर्णांशाने लोकप्रवाहात आणणे, नव्या वर्षात निरनिराळ्या वायरसांद्वारे भारताची पीछेहाट होऊ नये, म्हणून ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता व आर्थिक स्तरावर

भारताची चांगली प्रगती व्हावी यासाठी पुढील किमान पाच वर्षांसाठी ठोस कार्यक्रम तयार करणे या गोष्टी पक्षांना तातडीने कराव्या लागणार आहेत. यातच त्यांच्या संपूर्ण यशाचे रहस्य दडलेले असेल.

Story img Loader