Guru Vakri In Mesh: ज्योतिषशास्त्रात गुरु हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. सौर मंडळामध्ये गुरुला एक विशेष स्थान आहे. ज्योतीषशास्त्रात गुरुला देवतांचा गुरु मानले जाते. ज्योतिषशास्त्रात गुरुला धनु आणि मीन राशीचा स्वामी म्हटले जाते. सध्या देव गुरु बृहस्पति १२ वर्षांनंतर ४ सप्टेंबर रोजी मेष राशीत वक्री झाले असून चार महिने याच अवस्थेत राहणार आहेत. त्यामुळे काही राशींना अपार संपत्ती आणि धन मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींच्या लोकांचे नशीब उघडेल?

सिंह राशी

देव गुरु वक्री झाल्याने सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ ठरु शकतो. एकूणच माता लक्ष्मीची या राशीतील मंडळीवर कृपा असू शकते.

(हे ही वाचा : पुढील २० दिवस ‘या’ राशींवर बाप्पांची कृपा? बुधदेव मार्गी झाल्याने माता लक्ष्मीच्या कृपेने घरात येऊ शकतो प्रचंड पैसा )

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरु शकतो. यावेळी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. यासोबतच नोकरीत प्रगती होण्यासोबतच पगार वाढण्याचीही शक्यता आहे.  या काळात तुम्ही प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण करू शकता. व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. ज्या विवाहित लोकांना मुले होण्याची इच्छा आहे त्यांना या काळात चांगली बातमी मिळू शकते. 

मकर राशी

गुरुच्या वक्री होण्यामुळे मकर राशीचे भाग्य उजळू शकते. या राशीतील लोकांना करिअर आणि व्यवसायात खूप मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसायदारांसाठी मोठी संधी चालून येऊ शकते. या काळात तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीसह उत्पन्नात वाढ होऊ शकते. मान-सन्मान वाढू शकतो आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)