Guru Gochar Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु १४ मे रोजी मिथुन राशीत गोचर करेल आणि अतिचारी गतीने पाच महिन्यांनंतर १८ ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करेल. दरम्यान, शनीदेखील वक्री होईल. अशा परिस्थितीत, गुरु गोचरमुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. याशिवाय या राशींना अचानक आर्थिक लाभासह प्रगतीची संधीही मिळू शकेल. पण, नेमकं कोणत्या राशींना फायदा मिळेल जाणून घेऊ…
तुळ (Libra)
गुरुचा राशी बदल तुळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते. तसेच या काळात तुम्ही काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच यावेळी तुम्हाला प्रवासाची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरेल. मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक वाद मिटू शकतात. तसेच, या काळात तुम्ही पैसे बचत करण्यात यशस्वी व्हाल.
मीन (Pisces)
गुरु ग्रहाचा राशी बदल मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या सुखसोयीत वाढ होईल. तुम्हाला समाजात एक वेगळा आदर आणि प्रतिष्ठादेखील मिळेल. तसेच यावेळी तुम्हाला वाहन आणि मालमत्ता खरेदीचे सुख मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नात्यात गोडवा वाढेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा प्रगतीचा काळ असेल. नोकरीत नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल, यादरम्यान व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. तुमचे आईबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल.
वृषभ (Taurus)
गुरु ग्रहाचा राशी बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच आर्थिक परिस्थिती अजून मजबूत होऊ शकते. पैसे गुंतवण्याची ही योग्य वेळ आहे. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल आणि विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील, तुमच्या नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात.