वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह बदलतो किंवा त्याची राशी ठरवतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. गुरु २२ फेब्रुवारी २०२२ रोजी कुंभ राशीत अस्त होणार असून २३ मार्च २०२२ पर्यंत या स्थितीत राहील. गुरूच्या अस्ताचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण अशा पाच राशी आहेत त्यांना विशेष लाभ मिळणार आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्रात गुरु हा सर्वात शुभ आणि सात्विक ग्रह मानला जातो. कारण गुरु ग्रह शुभ परिणाम वाढवतो. जर कुंडलीत बृहस्पति चांगल्या स्थितीत असेल तर नशीब प्रत्येक कामात त्या व्यक्तीची साथ देते. त्याला भरपूर यश आणि आनंद मिळतो. तर गुरूच्या कुंडलीतील कमकुवत स्थितीमुळे दुःख आणि संघर्षमय जीवन जगावं लागतं. बृहस्पति हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. कर्क ही त्याची उच्च राशी आहे तर मकर ही त्याची निम्न राशी मानली जाते.
गुरु हा ज्ञान, शिक्षक, मुले, मोठा भाऊ, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थान, संपत्ती, दान, पुण्य आणि वृद्धी इत्यादींचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रात, गुरु हा २७ नक्षत्रांमध्ये पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्राचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाची कृपा असलेल्या व्यक्तीमध्ये सात्विक गुण विकसित होतात. त्याच्या प्रभावाने माणूस सत्याच्या मार्गावर चालतो.
Astrology 2022: राहु ग्रह मेष राशीत करणार प्रवेश; चार राशींवर असेल शुभ दृष्टी
२०२२ मध्ये गुरूचा हा बदल मेष, वृषभ, मिथुन, सिंह, तूळ या पाच राशींसाठी शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांना बृहस्पतिच्या प्रभावामुळे बहुतांश कामात यश, व्यवसायात नफा, करिअरमध्ये प्रगती होईल. या राशीचे लोक पैसे कमवू शकतात. एखादी व्यक्ती मोठी कामगिरी करू शकते. यासोबतच काही शुभ कार्यही केले जाऊ शकतात. त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल.