वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदल करतो किंवा उदय होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. कोणताही ग्रह सूर्याच्या जवळ आला की त्याचा प्रभाव कमी होतो आणि सूर्यदेव त्या ग्रहापासून दूर गेल्यावर त्या ग्रहाचा प्रभाव वाढतो. गुरु ग्रह बुधवारी सकाळी ६.४१ वाजता कुंभ राशीत उदयास आला आहे. २३ फेब्रुवारीला गुरु ग्रह अस्ताला गेला होता. गुरूच्या उदयामुळे सर्व राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडेल आणि त्यांना आनंद आणि सन्मान मिळेल. परंतु तीन राशी आहेत फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत ही तीन राशी.
मेष : गुरूचा उदय तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. कारण तुमच्या अकराव्या भावात गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. या काळात तुम्ही व्यवसायात चांगला नफा कमवू शकता. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. एक मोठा करार निश्चित होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. प्रतिष्ठा वाढू शकते. राजकारणात पद मिळू शकते.
वृषभ : तुमच्या राशीत गुरु दहाव्या भावात उदय होत आहे. या स्थानाला कर्म आणि करिअरचे स्थान म्हटले जाते. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर वेतनवाढ मिळू शकते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे. या काळात तुमची कार्यशैलीही सुधारेल. त्यामुळे बॉस तुमच्यावर खूश असेल. यावेळी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
Budhaditya Yog: मीन राशीत तयार होणार बुधादित्य योग, ‘या’ राशींना मिळणार आर्थिक लाभ!
सिंह : तुमच्या राशीत सातव्या भावात गुरुचा उदय होत आहे. हे स्थान भागीदारी आणि वैवाहिक जीवनाचे स्थान आहे, त्यामुळे या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा येऊ शकतो. तसेच भागीदारीच्या कामात वाढ होऊ शकते. या काळात आपण भागीदारी कार्य देखील सुरू करू शकता. जे लोक अविवाहित आहेत त्यांना या काळात लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. राजकारणात सक्रिय असलेल्यांना पद मिळू शकते. एकूणच गुरूचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.