वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा उदय-अस्त होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. देवतांचा गुरु बृहस्पती १३ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशी परिवर्तनाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचा संबंध ज्ञान, वाढ, शिक्षक, संतती, शिक्षण, संपत्ती, दान आणि पुण्य यांच्याशी आहे. त्यामुळे गुरूच्या राशी बदलाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांना या संक्रमणाचा विशेष लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत तीन राशी.
वृषभ: गुरूचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण गुरु तुमच्या अकराव्या भावात प्रवेश करेल. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसाय करार होऊ शकतात. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. या काळात तुमची कार्यशैली देखील सुधारेल, त्यामुळे तुमचा बॉस तुमच्यावर खूश असेल आणि तुमची प्रशंसा होईल.
मिथुन: तुमच्या संक्रमण कुंडलीत गुरु दशम भावात प्रवेश करेल. या स्थानाला नोकरी आणि कर्माचे घर म्हणतात. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात आणि व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. जे मार्केटिंग आणि मीडिया क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला असणार आहे.
Shani Gochar 2022: धनदेवता कुबेराची ‘या’ राशींवर असेल विशेष कृपा, कारण शनिदेव करणार राशी परिवर्तन
कर्क: हे संक्रमण तुमच्या राशीसाठी उत्तम सिद्ध होऊ शकते. कारण बृहस्पति तुमच्या नवव्या भावात प्रवेश करेल. हे स्थान भाग्य आणि परदेश प्रवासाचे संकेत देतं. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यासोबतच रखडलेली कामेही होतील. त्याच वेळी, आपण व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता, जे फायदेशीर सिद्ध होईल. दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय खाद्यपदार्थ, हॉटेल, रेस्टॉरंटशी संबंधित आहे, अशा लोकांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो.