Guru In Mrigshira Nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा विविध परिणाम १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे कुंडलीत गुरू शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला या सर्व गोष्टींची प्राप्ती होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, पुढच्या महिन्यात २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी गुरू ग्रह नक्षत्र परिवर्तन करील. सध्या गुरू रोहिणी नक्षत्रामध्ये उपस्थित असून तो मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करील. गुरू ग्रहाच्या मृगशिरा नक्षत्रातील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल.

गुरूचे नक्षत्र परिवर्तन चार राशींसाठी खास (Guru In Mrigshira Nakshatra)

मेष

गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना अनेक संधी प्राप्त होतील. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार व्यक्तींचे प्रमोशन होईल. व्यापारात यश मिळेल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यातील अडचणी तुम्ही दूर करण्यास सक्षम असाल.

वृषभ

गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल.

कन्या

गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.

हेही वाचा: तब्बल ९० वर्षांनंतर तिसऱ्या श्रावणी सोमवारी निर्माण होणार शुभ संयोग ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा

धनु

गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने धनु राशीच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अचानक धनलाभ होतील, या काळात धनु राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. मान-सन्मानात वाढ होईल. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru in mrigshira nakshatra 24 nakshatra transformation of jupiter will give knowledge happiness and wealth to the persons of these four signs sap