ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत उपस्थित असलेले सर्व ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलत राहतात. यावेळी ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होताना दिसतात. आता येत्या ३१ डिसेंबर २०२३ ला सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी गुरुदेव मार्गी होणार आहेत. एखादा ग्रह मार्गी होणे म्हणजे त्याने १८० अंशात सरळ रेषेत पुढे जाणे. देव गुरु मार्गी होताच गजकेसरी योग तयार होत आहे आणि यातच गुरु पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार होत आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी गजकेसरी योग आणि गुरु पुष्य योग बनल्याने काही राशींना येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे नशीब पालटणार?
मेष राशी
गजकेसरी योग आणि गुरु पुष्य योग बनल्याने मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. पैशांचा स्त्रोत वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळू शकतात. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात. बॉसकडून तुमची प्रशंसा होण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : १२ वर्षांनंतर होणार शुक्र-गुरूची युती; ‘या’ राशी होऊ शकतात श्रीमंत, जानेवारीपासून मिळू शकतो अपार पैसा )
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांना दोन शुभ योग बनल्याने नवीन वर्षात अचानक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. उत्पन्न वाढीचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. या व्यक्ती नवीन वर्षात बचत करण्यात यशस्वी होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशींच्या व्यक्तींच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते.
धनु राशी
धनु राशींच्या लोकांसाठी नवीन वर्ष एक नवीन पर्वच ठरु शकतो. गुरुदेवाच्या कृपेने या राशीतील लोकांचा खिसा सतत पैशाने भरलेला राहू शकतो. मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. थांबलेली कामे मार्गी लागू शकतात. नोकरीत पगार वाढण्याचीही शक्यता आहे. एवढंच काय तर नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे. समाजात मान-सन्मानात वाढू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. धनु राशीच्या लोकांचे आरोग्यही ठणठणीत राहण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)