Guru Margi 2025 Positive Impact : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाला देवांचा गुरू, असे म्हटले जाते; जो ज्ञान, शिक्षण, संतती व विवाहाचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा जेव्हा देवांचा गुरू गुरू असलेला हा ग्रह कोणत्याही राशीत मार्गी होतो, तेव्हा त्या राशींच्या लोकांचे भाग्य बदलू लागते. वैदिक पंचागांनुसार, वसंत पंचमीच्या बरोबर दोन दिवसांनी म्हणजे ४ फेब्रुवारी २०२५ रोजी गुरू थेट वृषभ राशीत मार्गी होणार आहे. गुरू ग्रहाच्या राशिबदलामुळे काही राशींच्या लोकांना फायदा मिळू शकतो. पण, नेमका कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होईल ते जाणून घेऊ…

मेष

गुरू ग्रह मार्गस्थ होण्यामुळे मेष राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते, अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते, तसेच नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. तुमच्या अधिक मेहनतीचे चांगले फळ मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. हा काळ तुमच्यासाठी खूप खास असेल. तुमच्या आयुष्यात स्थिरता येऊ शकते. तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता.

कन्या

हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने प्रगतीचा काळ आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात यश आणि पदोन्नती मिळू शकते. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. गुरू ग्रहाच्या आशीर्वादाने तुम्ही ठरवलेले अनेक प्लॅन यशस्वी होऊ शकतात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. आयुष्यात आनंद वाढेल. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जर तुम्हाला मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी हा काळ शुभ आहे.

मकर

हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी नवीन संधींनी भरलेला असेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. नोकरीत तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुम्हाला प्रलंबित पदोन्नतीदेखील मिळू शकतील. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. जीवनात स्थिरता येईल. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत यश मिळेल. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल कळतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात यश मिळेल. हा काळ व्यावसायिकांसाठीही फायदेशीर राहील. कुटुंबात आनंद आणि शांती राहील.

(टीप – वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे. )

Story img Loader