Guru Margi 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह ज्ञान, समृद्धी, ज्योतिष, शिक्षण आणि वैवाहिक सुखाचा कारक मानला जातो. त्यामुळे गुरुच्या हालचालीच्या बदलाने सर्व क्षेत्रांवर विशेष परिणाम दिसून येतो. यात गुरु ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजून ०१ मिनिटांनी वृषभ राशीत वक्री झाला आणि २ फेब्रुवारी २०२५ रोजी मार्गी झाला, म्हणजे सरळ चाल केली; यामुळे काही राशींचे नशीब आता पालटू शकते. या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नेमकं कोणत्या राशींना याचा फायदा होईल जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ

गुरुची सरळ चाल वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्ही यावेळी चांगले निर्णय घेऊ शकाल. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे नाते अधिक दृढ होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमचे आरोग्य सुधारेल. तुम्ही जे काही काम करण्याचा निर्णय घ्याल ते पूर्ण होईल. जीवनातील नकारात्मक प्रभावांचा प्रभाव कमी होईल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुची सरळ चाल फलदायी ठरू शकते. विशेषत: करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकते. व्यापारी चांगला आर्थिक नफा मिळवू शकतात. याशिवाय नोकरीत अनेक संधींसह पैसे कमविण्याचे नवीन मार्गही मिळतील. तसेच या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. जीवनात आनंद येईल. संपत्ती वाढली की समाजात मान वाढेल. त्याच वेळी वडिलांबरोबरचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुची सरळ चाल फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. तसेच या वेळी धार्मिक कार्यांमध्ये तुमची आवड वाढू शकते. तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होऊ शकते. अभ्यासात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत यशस्वी होऊ शकाल. तसेच, या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील.