Guru Margi 2023: ज्योतिषशास्त्रात गुरुची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. ज्या कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत असते त्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगलं बळ मिळतं. गुरु हा ग्रह ऐश्वर्य, वैभव, आध्यात्म, समृद्धी आणि शिक्षेचा कारक आहे. त्यामुळे गुरुची स्थितीत जराही बदल झाला तर राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. आता नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह वर्ष २०२३ च्या शेवटच्या दिवशी मार्गी होत आहे. येत्या ३१ डिसेंबर २०२३ रोजी देवगुरु मार्गी होणार आहेत. त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या आयुष्यात सुख, समृध्दी आणि यश लाभण्याची शक्यता आहे. पाहा कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ ३ राशी होतील श्रीमंत?

मेष राशी

देवगुरु मार्गी होताच मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यातील पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात. आरोग्य सुधारेल, जीवनात चांगले परिणाम दिसून येऊ शकतात, नोकरी-व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. बरेच दिवस रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभाच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना परदेशातून उत्पन्नाच्या नवीन संधी मिळू शकतात. 

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना देवगुरु आनंदच आनंद देऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. कामातील यश पाहून तुमचं मनं प्रसन्न आणि सकारात्मक राहू शकते. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तुमच्यासाठी खुले होऊ शकतात. जीवनात सुख-सुविधा वाढू शकतात. या काळात अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

(हे ही वाचा : तुमचं नाव काय? A to Z पर्यंत नावाचं पहिलं अक्षर सांगते तुमचा स्वभाव; पैशाच्या बाबतीत ‘हे’ ३ लोकं असतात खूपच भाग्यवान? )

वृश्चिक राशी

येत्या नवीन वर्षात वृश्चिक राशीचे लोकं मालामाल होण्याचे संकेत मिळत आहेत. मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना प्रमाणापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. तुमचे जुने अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात. तुम्ही जमीन किंवा वाहन देखील खरेदी करू शकता. जे काम कराल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला परदेशातही करिअर करण्याची संधी मिळू शकते. देवगुरुची कृपा असल्यामुळे नोकरीत बढती, बदली सारखे लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)