Guru nakshatra gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरू ग्रहाला एका राशीत प्रवेश करण्यासाठी जवळपास १२ वर्षांचा कालावधी लागतो. तसेच ठराविक वेळेनंतर गुरू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते.

पंचांगानुसार, गुरू ग्रह सध्या मृगशिरा नक्षत्रामध्ये उपस्थित असून तो २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. या नक्षत्रामध्ये तो १० एप्रिल २०२५ पर्यंत राहील. त्यामुळे हा काळ काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर असेल.

saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
surya guru gochar 2025 sun jupiter make kendra drishti yog these zodiac sign will be lucky
होळीच्या आधी ‘या’ तीन राशींची होईल चांदी! सूर्य-गुरू निर्माण करणार केंद्र योग, प्रत्येक कामात मिळणार यश
Maha Shivratri 2025 Shubh Sanyog
महाशिवरात्रीला निर्माण होत आहे दुर्मिळ संयोग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, भगवान शंकर पूर्ण करणार त्यांची प्रत्येक इच्छा
mahakumbh 2025
आज महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान! बुधादित्य योगामुळे ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय, करिअर -व्यवसायात मिळेल भरपूर यश
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

गुरू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन

वृषभ

गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. गुंतवणूकीतून चांगले पैसे मिळवाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तीर्थक्षेत्रांनाही भेट द्याल.

कर्क

गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा कर्क राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, या काळात मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. भावंडांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तुमचे आरोग्यही चांगले राहील.

हेही वाचा: राहू देणार बक्कळ पैसा; शनीच्या नक्षत्रात प्रवेश करताच ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी गुरू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. अनेक दिवसांरपासून सुरू असणाऱ्या समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. आयुष्याला नवी दिशा मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader