Guru Nakshatra Transit: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालींना एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरू बृहस्पति ग्रहाला सुख, सौभाग्य, ज्ञान आणि विवाहाचा कारक मानले जाते. सध्या गुरू ग्रह वृषभ राशीत असून ३१ जुलै रोजी गुरू नक्षत्र परिवर्तन करून रोहिणी नक्षत्राच्या चौथ्या चरणामध्ये प्रवेश करेल. १९ ऑगस्टपर्यंत गुरू याच स्थितीत राहील आणि पाच राशींना याचा भरपूर लाभ होईल.
मेष (Aries)
रोहिणी नक्षत्रात देवगुरु गुरूच्या चरण बदलामुळे मेष राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील. तसेच या राशीतल्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.
वृषभ (Taurus)
गुरु सध्या वृषभ राशीत आहे. गुरु ग्रहाच्या परिवर्तनाने वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. या राशीचे लोक या काळात धार्मिक ठिकाणी प्रवास करण्याची शक्यता आहे. घरामध्ये शुभ कार्ये होतील. तसेच काही मोठी कामे पूर्ण होतील.
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठीही हा काळ चांगला आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात विशेष लाभ मिळेल, तसेच उत्पन्नातदेखील वाढ होईल. या राशीच्या लोकांचं नशीब चमकेल आणि त्यांच्या प्रत्येक कामात सहज यश मिळेल.
सिंह (Leo)
गुरुच्या स्थितीतला बदल सिंह राशीच्या लोकांना फायदेशीर ठरेल. या राशीच्या लोकांची प्रगती होईल तसेच त्यांना नोकरी बदलायची असेल तर ही वेळ चांगली आहे. कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठीही हा काळ शुभ आहे. भगवान शिव तुम्हाला आशीर्वाद देतील.
कन्या (Virgo)
या काळात कन्या राशीच्या लोकांना त्यांचं नशीब साथ देईल. यावेळी योग्य निर्णय घेतल्यास खूप फायदा होईल. गंगाजलामध्ये दुर्वा मिसळून भगवान शिव शंकारांचा अभिषेक केल्यास खूप फायदा होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)