Laxmi Narayan Rajyog 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जुलै दुसऱ्याच आठवड्यात सर्वात शुभ व लाभदायक असा लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. बुध शुक्राच्या युतीने तयार होणारा लक्ष्मी नारायण राजयोग हा संपत्ती वाढीसाठी विशेष मानला जातो. या राजयोगाचा मूळ प्रभाव हा गुरुपौर्णिमेपासूनच सुरु होणार आहे. आज गुरु पौर्णिमेला ब्रह्म, इंद्र व बुधादित्य असे तीन बलाढ्य राजयोग तयात होत आहेत. अशातच मिथुन राशीत स्थिर असलेल्या बुध ग्रहावर सिंह राशीत प्रवेशासाठी निघालेल्या शुक्राचा प्रभाव वाढू शकतो. याच ग्रह संयोगाने लक्ष्मी नारायण राजयोग सुद्धा निर्माण होणार आहे. या राजयोगासह कोणत्या राशीच्या नशिबाचे दार उघडण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊया…
लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ४ राशींवर बरसणार पैशांचा पाऊस?
मेष रास (Aries Zodiac Horoscope)
जुलैमध्ये शुक्र- बुध युतीतून लक्ष्मी नारायण राजयोग बनतात मेष राशीचे लोक अत्यंत फायद्याचा कालावधी अनुभवू शकतात. तुम्हाला वाहन वाहन व प्रॉपर्टीच्या खरेदीचा योग आहे. मेष राशीच्या कुंडलीत चतुर्थ स्थानी हा राजयोग तयात होत आहे. यामुळे रिअल इस्टेट, स्वतःचा व्यवसाय, राजकारण या तीन प्रमुख क्षेत्रातील मंडळींची चांदी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. अचानक धनलाभ झाल्याने काही बाजूला सारून ठेवलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे बळ मिळू शकते. नोकरदार मंडळींनी विवेक हरवू देऊ नये.
कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)
लक्ष्मी नारायण योग कन्या राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो कारण हा योग आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत मिळकतीच्या केंद्रावर तयार होत आहे. आपल्या धनसंपत्तीत वाढ करणारे स्रोत येत्या काळात वाढू शकतात. नवीन मार्गांसह जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा मोठा फायदा मिळू शकतो. या काळात आपल्या कुटुंबाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करू शकता, जेणेकरून केवळ आर्थिकच नव्हे तर भावनिक दृष्टीने सुद्धा तुम्ही समृद्ध होऊ शकता. शेअर बाजारात फायदा होऊ शकतो.
मकर रास (Capricorn Zodiac Horoscope)
मकर राशीच्या गोचर कुंडलीत धन स्थानी लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे, तुम्हाला अडकून पडलेले धन पुन्हा मिळू शकते. विवाहयोग आहे. नवीन नोकरीसाठी प्रयत्नशील असल्यास लवकरच मुलाखतीची संधी चालून येऊ शकते. जोडीदाराचे सुख प्राधान्याने जपल्यास तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. भागीदारीच्या कामातून फायद्याचे संकेत आहेत. तुमच्या संवाद कौशल्यावर भर देऊन अनेक कामे मार्गी लाभू शकता.मीडिया , मार्केटिंग, शिक्षण या क्षेत्रातील मंडळींना लाभाचे संकेत आहेत.
तूळ रास (Libra Zodiac Horoscope)
केवळ लक्ष्मी नारायण राजयोगच नव्हे तर संपूर्ण जुलै महिन्यात तूळ राशीच्या फायद्याचे अनेक योग जुळून आले आहेत. लक्ष्मी नारायण योग आपल्या राशीच्या कुंडलीत कर्म स्थानी तयार होत आहे. यामुळे येत्या काळात तुम्हाला मेहनतीपासून सुटका नाही पण केलेल्या प्रत्येक कामाचे दुप्पट फायदे सुद्धा मिळू शकतात. व्यावसायिक व नोकरदार दोन्ही वर्गासाठी हा काळ फायद्याचा ठरू शकतो. नवीन संपर्क जोडले जातील ज्यांच्या मार्फत तुम्हाला गुंतवणूक व धनप्राप्तीचे संकेत आहेत.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)