Guru Purnima 2024: हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात. पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी २० जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल आणि २१ जुलै रोजी दुपारी ३:४७ वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, गुरूपौर्णिमेचा पवित्र सण २१ जुलैला सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार, गुरुपौर्णिमा तिथी महर्षी वेदव्यास यांना समर्पित आहे. या दिवशी महर्षी व्यास यांची जयंती साजरी केली जाते. तर ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा विशेष संयोग जुळून येतोय.

यावेळी गुरुपौर्णिमेला शुभ योगांची स्थिती आहे. यंदाच्या गुरुपौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, प्रीति योग, विश्वकुंभ योग जुळून येत आहे. गुरुपौर्णिमेला ग्रहांची अशी जुळवाजुळव होत आहे, जी अत्यंत दुर्मिळ आहे. एक नाही तर अनेक शुभ योग या दिवशी घडून येणार आहेत. या शुभ योगांमुळे गुरुपौर्णिमेला अनेक राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी….

‘या’ राशींना होणार सुख प्राप्त?

वृषभ राशी

गुरुपौर्णिमेला शुभ योग जुळून येत असल्याने वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे.  तसेच परदेशात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर, या काळात मकर राशीच्या लोकांचे जोडीदारासोबतचे नाते चांगले राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : पुढील महिन्यापासून ‘या’ राशीधारकांसाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार? ग्रह राजा मोठी उलाढाल करताच तुम्हीही होऊ शकता श्रीमंत )

सिंह राशी

गुरुपौर्णिमेला शुभ योग जुळून येत असल्याने सिंह राशीच्या लोकांना लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय चमकण्याची शक्यता आहे. तुमची महत्त्वाची कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल ठरु शकतो. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नोकरीत असलेल्या लोकांनाही बढती मिळू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी

शुभ योगांच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. कष्टाचं गोड फळ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कामात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवे मार्ग सापडण्याची शक्यता आहे. प्रेमात असाल तर प्रेमसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)